Pulses Export
Pulses Export Agrowon
ॲग्रो विशेष

Pulses Export : कडधान्य निर्यातीत २२ टक्क्यांनी घट

Team Agrowon

Pulses News : पुणे ः देशातील कडधान्य उत्पादन घटल्याने भाव वाढले. त्यामुळे बांगलादेश, चीन आणि युएई या देशांनी कमी आयात केली. परिणामी आयात वाढून निर्यात कमी झाली. देशातून २०२३-२४ या आर्थिक वर्षात कडधान्याची निर्यात तब्बल २२ टक्क्यांनी कमी झाली.

भारत अजूनही कडधान्यामध्ये पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेला नाही. त्यामुळे भारतात तूर, उडीद, मसूर यासारख्या कडधान्याची आयात करावी लागते. तर भारतातून कडधान्याची निर्यातही होत असते. भारताच्या कडधान्याचे मुख्य ग्राहक शेजारचे बांगलादेश, चीन आणि युएई हे देश आहेत. पण चालू हंगामात देशात दुष्काळी स्थिती आहे. पाऊस कमी झाल्याने कडधान्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला. उत्पादन कमी झाल्याने देशात तूर, हरभरा, उडीद, मूग या कडधान्याचे भाव वाढले. देशात मागणी असल्याने आयात मोठ्या प्रमाणात वाढली. पण भाव वाढल्याने निर्यात मात्र मंदावली आहे.

भारतातून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जवळपास ६ लाख टन कडधान्य निर्यात झाली. मात्र २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात ७ लाख ६२ हजार टन कडधान्य निर्यात झाली होती. भारतातून हरभरा निर्यातही चांगली होत असते. पण यंदा हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा १० ते १५ टक्क्यांनी जास्त आहेत. त्यामुळे हरभरा निर्यातीवर परिणाम झाला. मागील काही वर्षांमध्ये हरभरा हमीभावापेक्षा कमी होता. या वर्षांमध्ये देशातून बांगलादेश आणि नेपाळ या देशांना चांगली निर्यात झाली होती.


बांगलादेश मोठा ग्राहक
भारताच्या कडधान्याचा बांगलादेश सर्वात मोठा ग्राहक आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतातून बांगलादेशला १ लाख ८५ हजार टन निर्यात झाली. मात्र आधीच्या वर्षातील निर्यात २ लाख टन होती. चीनला होणाऱ्या निर्यातीत मोठी घट झाली आहे. चीनची भारतीय कडधान्य आयात १ लाख ६५ हजार टनांवरून थेट ५० हजार टनांपर्यंत कमी झाली. तर युएईची आयात जवळपास दीड लाख टनांवरून ८० हजार टनांपर्यंत कमी झाली.

प्रतिक्रिया
भारतातून हरभरा आणि काबुली हरभऱ्याची निर्यात कमी झाली. तर दुसरीकडे मसूर, तूर आणि उडदाच्या निर्यातीत काही प्रमाणात वाढ झाली. त्यातही मसूरची निर्यात जवळपास दुपटीपेक्षा जास्त झाली.
- राहुल चौहान, शेतीमाल बाजार विश्लेषक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest : कर्जमाफी, पीकविमा भरपाईसाठी ‘रास्ता रोको’

Jackfruit Research : फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १ लाख ३७ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Maharashtra Rain Update : पावसाचा जोर; पंचगंगा पात्रा बाहेर, मुंबईत एनडीआरएफची पथके तैनात

Jalgaon ZP : जळगाव जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून प्रशासकराज

SCROLL FOR NEXT