
Sangli News : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात मूग, तूर, उडीद यासह अन्य कडधान्यांची पेरणी केली जाते. परंतु यंदा पावसाने दडी मारली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामातील कडधान्याच्या क्षेत्रात २३ हजार ५६१ हेक्टरने घट झाली आहे. त्यातच पावसाचा खंड पडल्याने पिकांची पुरेशी वाढ झाली नसल्याने उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत आणि खानापूर तालुक्यात उन्हाळी पाऊस झाल्यानंतर तूर, मूग, उडीद या पिकांसह अन्य कडधान्य पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकरी पुढे येतात. त्यानुसार पेरणीच्या पूर्व मशागतीची तयारी केली जाते. जिल्ह्यात गतवर्षी दुष्काळी पट्ट्यात उन्हाळी पाऊस चांगला झाला.
पेरणी करण्यासाठी पोषक वातावरण होते. कडधान्याचे सरासरी क्षेत्र ४० हजार हेक्टर ५२८ होते. त्यापैकी ३९ हजार ७६९ हेक्टरवर पेरा झाला होता. जिल्ह्यात तुरीचा पेरा ९८४५, मुगाचा ५३४५, उडीद १८५३०, इतर कडधान्ये ६०७४ हेक्टरवर पेरा झाला होता. कडधान्य पिकांच्या वाढीच्या दरम्यान पाऊस झाल्याने पिकांची वाढ चांगली झाली होती, त्यामुळे अपेक्षित उत्पादनही मिळाले होते.
यंदाच्या हंगामात कडधान्याचे सरासरी क्षेत्र ४० हजार ५२८ हेक्टर असून १६ हजार २०८ हेक्टरवर पेरा झाला आहे. तुरीचा पेरा ६६४८, १५९३, ५७६६ तर इतर कडधान्ये २२०० हेक्टरवर पेरा झाला आहे. यंदाच्या हंगामात उन्हाळी पाऊस पडलाच नाही. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी प्रतीक्षा करत होते.
पुरेसा पाऊस झाला नसल्याने कडधान्यांची पेरणी करण्यासाठी शेतकरी पुढे आलेच नाहीत. गतवर्षी जिल्ह्यात कडधान्याची ३९ हजार ७६९ हेक्टरवर पेरणी झाले असून यंदा १६ हजार २०८ हेक्टरवर पेरा झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २३ हजार ५६१ हेक्टरने क्षेत्रात घट झाली आहे.
तालुकानिहाय तुलनात्मक पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका २०२२ २०२३
मिरज ४३३१ ५०५
जत २२७८३ ८७६२
खानापूर ४१०० २४६८
वाळवा १३३ १०५
तासगाव २०७७ २०१४
आटपाडी ७९० १०५
कवठेमहांकाळ ३९८९ ११८०
पलूस २५८ २२८
कडेगाव १३०७ ८४०
एकूण ३९७६९ १६२०८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.