Tomato Trader Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Traders : व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे टोमॅटो विक्रीचे थकविले २२ लाख

Fraud of Tomato Farmers : पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो विक्रीनंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्याचा नियम आहे, पण टोमॅटो विक्री करून तीन महिने उलटूनही डीकेजी फर्मचे व्यापारी देवेंद्र सोनी यांनी शेतकऱ्यांचे २२ लाख रुपये थकविले आहेत.

Team Agrowon

Nashik News : पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो विक्रीनंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्याचा नियम आहे, पण टोमॅटो विक्री करून तीन महिने उलटूनही डीकेजी फर्मचे व्यापारी देवेंद्र सोनी यांनी शेतकऱ्यांचे २२ लाख रुपये थकविले आहेत.

या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांच्या नेतृत्वाखालील सोमवारी (ता.१८) बाजार समितीत सचिवांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. येत्या पाच दिवसांत थकीत रक्कम न मिळाल्यास बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत व्यापारी देवेंद्र सोनी यांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केला. शेतकऱ्यांची काही रक्कम अदा केली, पण शेतकऱ्यांचे तब्बल २२ लाख रुपये थकविले. अगोदरच बाजारभाव गडगडले असताना, मातिमोल भावात टोमॅटोची विक्री करावी लागली.

त्यात शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांनी थकविल्याने दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे. १५ दिवसांपूर्वी यतीन कदम यांनी बाधित शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याची बैठक घेतली. आठ दिवसांत थकीत रक्कम देण्याचे व्यापाऱ्याने मान्य केले. मुदत संपूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले.

बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीचे सचिव संजय लोंढे यांच्या दालनात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. सचिव लोंढे यांनी सभापती तथा आमदार दिलीप बनकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.

श्री. कदम व आमदार बनकर यांच्यात संवाद झाला. आठवड्याभरात थकीत रक्कम देण्यास व्यापाऱ्याला तंबी देण्याचे आश्वासन सभापती बनकर यांनी दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकरी ओमकार मोरे, बाळासाहेब धुमाळ, शरद आहेर, माधव खैरे, राहुल रकिबे, मयूर रकिबे, सुरेश धुमाळ, दत्तू रकिबे, किरण कुयटे, रोहित जगताप, संजय आहेर, प्रवीण आहेर, रोहित जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT