Dalmia Sugars : दालमिया शुगर्स विरोधात राजू शेट्टी आक्रमक, उद्या कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन

Sugarcane Rate : ऊसदर शेतकऱ्यांना अमान्य असून दत्त दालमियाने एफआरपी अधिक १०० रुपये म्हणजे ३ हजार ३८४ पहिली उचल द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Dalmia Sugars
Dalmia Sugarsagrowon
Published on
Updated on

Raju Shetti : 'दत्त दालमिया साखर कारखान्याची यंदाची एफआरपी ३ हजार २८४ रुपये असताना, कारखाना प्रशासनाने मात्र उसाला प्रतिटन पहिली उचल ३ हजार २०० रुपये प्रमाणे देवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे हा ऊसदर शेतकऱ्यांना अमान्य असून दत्त दालमियाने एफआरपी अधिक १०० रुपये म्हणजे ३ हजार ३८४ पहिली उचल द्यावी.

अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता.५) कारखाना गेटवर ठिय्या आंदोलन करून कारखाना बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. वाघवे (ता. पन्हाळा) येथील हनुमान मंदिर प्रांगणात शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप पाटील होते. दरम्यान दत्त दालमिया साखर कारखान्याने गतसाली तुटलेल्या उसाला प्रतिटन अतिरिक्त ५० रुपये देणार असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ५० रूपयांच्या बिलाबाबत आवश्यक असणाऱ्या शासकीय बाबींची पूर्तता आणि परवानगी मिळाल्यानंतर बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Dalmia Sugars
Dalmia Sugar Factory Kolhapur : दालमिया शुगर्सच्या धोरणामुळे विकास सेवा संस्था अडचणीत, सतेज पाटील यांना निवेदन

जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी गेली दोन महिने आंदोलन केले. यामुळे बहुतांश साखर कारखान्यांचा हंगाम पुढे गेला आहे. काही खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबरच्या आसपास हंगाम सुरू केले आहेत.

कोल्हापूर विभागात एकूण १७ लाख टन ऊस गाळप झाले आहे. काही साखर कारखान्यांचा हंगाम पंधरा दिवसांच्यावर व महिन्यावर गेला आहे. १७ लाख टन ऊस गाळपानुसार सुमारे ३००० ते ३२०० एफआरपीनुसार सुमारे ५०० कोटी रुपये विभागातील शेतकऱ्यांचे ऊस बिल होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com