Ranil Wickremesinghe Agrowon
ॲग्रो विशेष

Srilanka Organic Farming : श्रीलंकेसाठी २०२३ वर्षे महत्त्वाचे ठरणार : विक्रमसिंघे

Team Agrowon

श्रीलंकेने २०२२ मधून २०२३ प्रवेश केला आहे. मात्र २०२३ वर्ष देशासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. या वर्षात श्रीलंकेच्या संकाटात अडकलेल्या अर्थव्यवस्थेला (Srilanka Crisis) रुळावर आणणे गरजेचे आहे, असे मत श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी व्यक्त केल्याचे वृत्त डेली मिरर (Daily Mirror) या वृत्तसंस्थेने दिले आहे.

डेली मिररच्या वृत्तानुसार, विक्रमसिंघे यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा देताना म्हणाले की, अनेक अडचणी नंतर २०२३ या वर्षात आपण पोहचलो आहोत. मागील वर्षी जनतेला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागलं. अनिश्चतेचं वातावरण दूर झाल्यानंतर आपण २०२३ वर्षे बघत आहोत."

विक्रमसिंघे पुढे म्हणाले, "मी त्या कठीण काळातील जनतेचे हाल समजू शकतो. त्या काळात अनेकांना देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्ठेचे दुष्परिणाम भोगावे लागले. २०२२ वर्षात कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडण्याची आशा घेऊन सुरू झाले होते. मात्र देशातील जनतेसाठी २०२२ वर्ष दुख:द स्वप्न ठरलं."

"२०२२ मध्ये आर्थिक घडामोडींना वेग आला होता. मात्र मागील काही वर्षात धोरणात्मक पातळीवर घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सर्वात वाईट स्थितीत गेली. परकीय चलन, महसूल आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न यामुळे देशातील लोकांचे व्यवसाय धोक्यात आले. आणि आवश्यक संसाधने अपुरे पडली." असेही विक्रमसिंघे म्हणाले.

डेली मिररच्या वृत्तानुसार, "मी तुमच्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो. तुम्ही देशासाठी वचनबद्ध आहात. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी पावले उचलल्याबद्दल आणि तुमच्या संयम आणि धैर्याबद्दल मी तुमचा आभारी आहे." असे विक्रमसिंघे यांनी शुभेच्छा संदेशात सांगितले.

दरम्यान, श्रीलंकेत सुमारे ४० टक्के कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. जून ते डिसेंबर २०२२ पर्यंत शेती उत्पन्नात घट झाली आणि खाद्यपदार्थांच्या किंमती १०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. रासायनिक खतांच्या वापरावर बंदी घालत श्रीलंका सेंद्रिय शेतीकडे वळला होता. त्यातून श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडली. त्यामुळे अभूतपूर्व अशी अराजकता श्रीलंकेने अनुभवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT