Team Agrowon
विषमुक्त व रसायनविरहित अन्नधान्य, भाजीपाला आणि फळपिके घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे.
सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे. जी लहान शेतकर्यांसाठी फायदेशीर आणि उपयुक्त आहे.
सेंद्रिय शेतीत उपलब्ध असलेल्या आणि कमी निविष्ठांमध्ये शेती करता येते.
युरोप, अमेरिका, चीन आदी विकसित देशातून प्रचंड प्रमाणात सेंद्रिय मालास मागणी असली तरी तेथील सेंद्रिय मालाची प्रमाणीकरण तपासणी ही कडक आहे.
रासायनिक खते, कीटकनाशके व अन्य औषधे यांचा अतिवापराने शेतमाल जरी दिसण्यास आकर्षक असला तरी प्रकृतीस हानिकारक ठरतो हे ग्राहकांच्या लक्षात येत आहे.
सेंद्रिय भाजीपाला व फळे रासायनिक मालाच्या तुलनेत कमी आकर्षक असल्याने सामान्य व मध्यम ग्राहकवर्ग रासायनिक निविष्ठांचा वापर केलेल्या शेतीमालास अधिक पसंती देताना दिसतात.