Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : मराठवाड्यातील ११ पैकी २ मोठे प्रकल्प अजूनही तुडुंब

Marathwada Water Stock : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सध्याच्या स्थितीला ९९ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी निम्न तेरणा व येलदरी हे दोन प्रकल्प अजूनही तुडुंब आहेत. इतर नऊ प्रकल्पांपैकी एका प्रकल्पात ७४ टक्के, दोन प्रकल्पात अनुक्रमे ८० व ८६ टक्के, दोन प्रकल्पात ९६ टक्के तर चार प्रकल्पात ९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सध्याच्या स्थितीला ९९ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. येलदरी प्रकल्प तुडुंब आहे सिद्धेश्वर प्रकल्पात ८६ टक्के माजलगाव मध्ये ८० टक्के पाणीसाठी आहे.

मांजरा, विष्णुपुरी व उर्ध्व पेनगंगामध्ये ९९ टक्के, निम्नतेरणामध्ये १०० टक्के, निम्नमनारमध्ये ९६ टक्के, निम्न दुधनामध्ये ७४ टक्के तर सीना कोळेगाव प्रकल्पात ९६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. २०१९ ते २२ पर्यंतच्या पाणीसाठ्याचा विचार करता यंदाचा सर्व ११ मोठ्या प्रकल्पातील उपलब्ध असलेला उपयुक्त पाणीसाठा सर्वाधिक असल्याची स्थिती आहे.

 जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून विसर्ग वाढविला

अलीकडेच विभागीय आयुक्तालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मराठवाड्यातील विविध प्रकल्पांमधून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तांत्रिक अडचणीमुळे नियोजित वेळेपेक्षा एक दिवस विलंबाने जायकवाडीतून डाव्या कालव्याद्वारे दोन दिवसांपूर्वी विसर्ग सुरू करण्यात आला. सुरवातीला २०० क्युसेकने सुरू करण्यात आलेला विसर्ग शनिवारी (ता. ३०) सुमारे १२०० क्युसेक वर नेण्यात आला होता. टप्प्याटप्प्याने हा विसर्ग २००० क्युसेकवर नेण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT