RTE Agrowon
ॲग्रो विशेष

Right To Education : राज्यातील १९ हजारांवर विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता

Transport Allowance To Student : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) वाहतूक भत्ता देण्यासाठी राज्यातील १९ हजार ७९३ विद्यार्थ्यांना पात्र ठरले आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Wardha News : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) वाहतूक भत्ता देण्यासाठी राज्यातील १९ हजार ७९३ विद्यार्थ्यांना पात्र ठरले आहेत. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील ३ हजार ३६४ गावे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, या निर्णयामुळे राज्यातील कोणतीही शाळा बंद केली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवीच्या स्तरावर एक किलोमीटरच्या आत, सहावी ते आठवीच्या स्तरावर तीन किलोमीटरच्या आत, तसेच पाच किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा, वाहतूक भत्ता देण्यात येतो.

त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हे, महापालिका यांच्याकडून शाळा, गावे यातील अंतराबाबत सादर केलेल्या माहितीच्या अनुषंगाने विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार राज्यातील १९ हजार ७९३ विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे.

तर राज्यातील ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील ३ हजार ३६४ गावे निश्चित केल्याचे नमूद केले आहे. गत काही महिन्यांत राज्यात समूहशाळांची निर्मिती करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे.

समूहशाळांसाठी कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यात येणार असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची वसतिस्थाने आणि वाहतूक भत्त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित करण्याबाबतच्या शासन निर्णयात कोणतीही शाळा बंद केली जाणार नसल्याचे नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT