Right To Education : ‘आरटीई’ शैक्षणिक सवलत दहावीपर्यंत मिळावी

Education Policy : राज्यात (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत फिमध्ये सवलत दिली, मात्र ही सवलत अडचणी असल्याचे दिसत आहे.
RTE
RTEAgrowon

Nagar News : राज्यात (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत फिमध्ये सवलत दिली, मात्र ही सवलत अडचणी असल्याचे दिसत आहे.

सवलतीची मुदत संपलेल्या राज्यभरातील सुमारे ७० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आर्थिक प्रश्न तयार झाला आहे. त्यामुळे सवलत कालावधीत वाढ करून ती दहावीपर्यंत करावी, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे.

RTE
Right To Information : माहिती अधिकारात माहिती मागणारे कार्यकर्ते ठरवले ‘त्रासदायक व्यक्ती’

संभाजी दहातोंडे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी केली आहे, की नामांकित खासगी शाळांत शिक्षण घेता यावे यासाठी शासन आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवून त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो. संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासन भरते.

RTE
RTE Vacancy : ‘आरटीई’च्या ४३ हजार जागा रिक्तच

२०१४ साली सर्वप्रथम प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची आता मुदत संपली आहे. या योजनेतून प्रवेश घेतलेल्या बहुतांश विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील आहेत. आठवीपर्यंतची शैक्षणिक सवलत संपलेल्या राज्यातील सुमारे सत्तर हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसमोर मात्र अनेक गंभीर अडचणी निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ज्या शाळांमध्ये या योजनेतून प्रवेश मिळाला त्या शाळांची नववी आणि दहावीची हजार रुपये आहे. ज्या काळात सर्वाधिक फी आहे त्याच काळात ही योजना संपुष्टात येत आहे. योजनेतून सवलत घेऊन आठवीपर्यंत शिकलेले विद्यार्थ्यांचे नववीचे शिक्षण घेण्यासाठी संबंधित शाळेची हजारो रुपयांची फी भरल्याशिवाय शाळा व्यवस्थापन प्रवेश देत नाही. त्यामुळे नववीपासून पुढचे शिक्षण करण्यास अडचण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com