RTE Vacancy : ‘आरटीई’च्या ४३ हजार जागा रिक्तच

RTE Update : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी बालकांच्या प्रवेशासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली.
Education
Education Agrowon

RTE Nagpur News : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी बालकांच्या प्रवेशासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, अद्याप राज्यातील प्रवेशाच्या ४३ हजार २७२ जागा, तर विदर्भातील ७८२१ जागा रिक्तच आहेत. आता प्रवेशासाठी २२ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

‘आरटीई’ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षासाठी ‘आरटीई’ प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पालकांची झुंबड उडाली होती.

यामुळे यंदा तीन लाख ६४ हजार ४१३ एवढ्या विक्रमी प्रवेश अर्जाची नोंद झाली. राज्यातील ८ हजार ८२३ शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४६ प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या. यात ९४ हजार ७०० बालकांना ऑनलाइन लॉटरीद्वारे प्रवेशही जाहीर झाले होते. प्रतीक्षा यादीत ८१ हजार १२९ बालकांचा समावेश करण्यात आला.

Education
Life Education Activities : आधुनिक मानसशास्त्रावर आधारित जीवन शिक्षण उपक्रम

ऑनलाइन लॉटरीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी समितीकडून करून प्रत्यक्ष शाळामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया १३ एप्रिलपासून सुरू झाली. आत्तापर्यंत महिनाभरात राज्यात केवळ ५८ हजार ५७४, तर विदर्भात १२ हजार ६६७ बालकांचेच प्रवेश निश्चित झालेले आहेत.

आता प्रवेश घेण्यासाठी १५ मे पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुदतवाढ देऊनही पालकांकडून प्रवेशाकडे पाठ फिरविण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनस्तरावरूनच घेण्यात आला आहे.

वाढीव कालावधीतील दाखले, कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेशासाठी संधी मिळेल.

प्रवेश स्थिती

राज्य

शाळा - जागा- अर्ज- निवड- प्रवेश

८८२३ १०१८४६ ३६४४१३ ९४७०० ५८५७४

विदर्भ

जिल्हा - शाळा- जागा- अर्ज - निवड- प्रवेश

अमरावती- २३६- २३०५- ९३३८- २२८७- १३६६

अकोला- १९०- १९४६ - ७११२- १९२४ - १३१७

बुलडाणा- २२७ - २२४६- ७०५४- २२०३ - १५७७

वाशीम - ९९- ७८६ - २७६६- ७७५ - ४८७

यवतमाळ - १९४- १९४०- ७४४८- १९१७ - १२८६

Education
Veterinary Education : ‘पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधनातून साम्य आरोग्य संकल्पना साकारावी’

चंद्रपूर - १८६- १५०३- ४८३०- १४५६- ८९६

गडचिरोली - ६६ - ४६५- १३८०- ४३३- २७४

भंडारा- ८९ - ७६३- ३१५६- ७६३- ४८९

गोंदिया - १३१- ८६४- ३९५९- ८६३- ६३१

नागपूर - ६५३ - ६५७७ - ३६४९०- ६५१३ - ३६०२

वर्धा - १११- ११११- ४९८६ - ११११- ७४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com