Agriculture Land Agrowon
ॲग्रो विशेष

Mortgage Land : सावकारांकडून मिळाली १८ हेक्‍टर जमीन परत

Money Lending : सावकाराच्या दाराशी गेलेल्या या शेतकऱ्यांकडून काही लाख रुपयांच्या कर्जासाठी संपूर्ण शेतीचे गहाण किंवा खरेदी खत करून घेतले जाते.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravti News : हंगामात बॅंकांकडून वित्तपुरवठ्यास टाळाटाळ होते. परिणामी शेतकरी सावकारी कर्ज घेतात. त्यांच्याकडून शोषण होत असल्याने यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी सहकार खात्याकडे ५१ प्रकरणे दाखल केली आहेत. यातील दहा प्रकरणांत शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेली शेती परत मिळाली आहे.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, बाजारभाव यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यातच बॅंक कर्जाचा भरणा करणे शक्‍य होत नसल्याने शेतकरी थकित कर्जदार ठरतात. परिणामी, त्यांना दुसऱ्या हंगामात बॅंकांकडून कर्जास टाळाटाळ होते. असे शेतकरी मग खासगी कर्जाचा पर्याय निवडतात. सावकाराच्या दाराशी गेलेल्या या शेतकऱ्यांकडून काही लाख रुपयांच्या कर्जासाठी संपूर्ण शेतीचे गहाण किंवा खरेदी खत करून घेतले जाते.

त्यानंतरच्या काळात कर्ज व व्याजाचा भरणा करूनही शेती परत केली जात नाही. जिल्ह्यात अशा प्रकारच्या ५१ तक्रारी सहकार खात्याला प्राप्त झाल्या होत्या. यातील १० प्रकरणांत सुनावणी होऊन १५ शेतकऱ्यांना १८.८५ हेक्‍टर जमीन परत मिळाली आहे.

त्यासोबतच एका प्रकरणात शेतकऱ्याला ३.५० लाख रुपयांचा परतावाही करण्यात आला. उर्वरित प्रकरणात सुनावणी सुरू असल्याची माहिती सहकार खात्याच्या सूत्रांकडून देण्यात आली. विशेष म्हणजे सावकारांकडून दामदुप्पट तसेच चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जाते.

तालुकानिहाय अधिकृत सावकार

जिल्ह्यात अधिकृत किंवा सहकार विभागाचा परवाना असलेल्या सावकारांची संख्या ४०९ इतकी आहे. त्यामध्ये अमरावती २२९, भातकुली ९, मोर्शी ३२, अंजनगावसुर्जी २३, धामणगाव २४, वरुड ३३, अचलपूर १३२, धारणी १६, नांदगाव खंडेश्‍वर १२, चांदूर रेल्वे ९, चांदूरबाजार ३८, तिवसा २८, दर्यापूर १३ याप्रमाणे संख्याबळ आहे. सावकारी नोंदणीकरिता केवळ ५०० रुपये शुल्क आहे. त्यामुळे जिल्ह्यात सावकारांची संख्या वाढती असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT