Illegal Money Lending : अमरावती जिल्ह्यात १३१ अवैध सावकार

Money lending : परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या जिल्ह्यातील १३१ सावकारांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नोटीस बजावली आहे.
Money Lending
Money LendingAgrowon

Amravati News : परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या जिल्ह्यातील १३१ सावकारांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नोटीस बजावली आहे. या सावकारांनी तत्काळ नूतनीकरण न केल्यास त्यांचे सावकारीचे परवाने रद्द करण्यात येतील असा दम भरण्यात आला आहे.

खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमिवर अनेक शेतकरी खासगी सावकारांकडून मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेतात. याशिवाय अन्य कारणांसाठी अनेकजण या सावकारांकडून कर्ज घेतात. या सावकारांना कर्ज वितरणासाठी व व्यवसायासाठी परवाने घेणे बंधनकारक आहे. दरवर्षी त्यांना परवान्याचे नूतनीकरण करावे लागते.

जिल्ह्यात नोंदणीकृत ५८९ सावकारांपैकी आजवर ३९७ सावकारांनी परवान्याचे नूतनीकरण केले आहे. १३१ सावकारांनी मात्र नूतनीकरण केलेले नसल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी नोटीस जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बजावली आहे.

Money Lending
Illegal Sand Mining : अवैध वाळू उपशाचा सोलापूर जिल्ह्यात सुळसुळाट

यासोबतच अचलपूर तालुक्यातील ६१ सावकार तपास शुल्कावरून २०२० मध्ये न्यायालयात गेले आहे. त्यांचे प्रकरण मागील ३ वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. अद्याप या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय यायचा आहे.

खरेदी-विक्रीसाठी सावकारांना उपनिबंधक कार्यालयाचा परवाना आवश्यक असतो. शासनाद्वारे सावकारांनी किती व्याज घ्यावे, याचीही टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे.

परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून अनेकजण अवैधपणे सावकारी करीत आहेत. जे मोठ्या प्रमाणात व्याजाची आकारणी करतात, त्यांच्याबाबत तक्रार आल्यास कारवाई केली जाते.

दरवर्षीची ही नियमित प्रक्रिया असून जिल्ह्यात जे वैध सावकार आहेत त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करून घेतले जाते. जे करीत नाहीत, त्यांना नोटीस बजावून आठवण दिली जाते. त्यानंतरही त्यांनी नूतनीकरण न केल्यास त्यांचे सावकारीचे परवाने रद्द करण्यात येतात. त्यांनी तरी व्यवसाय केल्यास अवैध मानून कायदेशीर कारवाई करण्यात येते.
विनायक कहाळेकर, जिल्हा उपनिबंधक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com