Cow Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Subsidy : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळणार १७ कोटी, गोकुळ आणि वारणेला मोठा फायदा

Gokul Cow Milk Rate : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ आणि वारणा दूध संघाला याचा तब्बल १७ कोटींचा फायदा होणार आहे.

sandeep Shirguppe

Cow Milk Rate News : राज्यातील अनेक दूध संस्थांनी गायीच्या दुधाच्या दरात कपात केली होती. दरम्यान याबाबत मागच्या कित्येक दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावरची लढाई करत आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गाय दुधासाठी प्रतिलिटर जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला दरम्यान या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ आणि वारणा दूध संघाला याचा तब्बल १७ कोटींचा फायदा होणार आहे.

गायीचे दूध परवडत नसल्याने गोकुळ आणि वारणाने गाय दुधाचे दर कमी केले होते. यामुळे जिल्ह्यात विविध पक्ष, संघटनांनी आंदोलने केली. रास्ता रोको करून शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आणला. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे गाय दूध दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना दुभती जनावरे विकण्याची वेळ आली होती. यावर राज्य शासनाने दोन महिन्यांसाठी ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ आणि वारणा दूध संघाच्या दूध उत्पादकांना महिन्याला १७ कोटी ७५ लाख रुपयांचा फायदा होणार आहे. सध्या गोकुळ गायीचे ८ लाख लिटर दूध संकलन करत आहे तर वारणा संघाकडे साडेतीन लाख लिटर गाय दूध संकलित होत आहे.

एक जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत संकलित दुधाच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे. दूध उत्पादकांना दिवसाला ४० लाख, दहा दिवसाला चार कोटी आणि महिन्याकाठी १२ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्ड आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक केले आहे. ज्यांनी अशी कार्ड लिंक केली आहेत, त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होण्यास अडचण येणार नाही; मात्र, ज्यांच्याकडे पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक नाही, अशा शेतकऱ्यांसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरणार आहे.

असे मिळणार अनुदान

गाय दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान लागू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत हे अनुदान देण्यात येणार. तर दूध संस्थांनी ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफच्या दुधासाठी प्रतिलिटर किमान २९ रुपये दर देणे बंधनकारक असून शासनाचे अनुदान थेट बँक खात्यावर जमा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT