Livestock Development Department : महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय पुन्हा अकोल्यात

Radhakrishna Vikhe Patil : गेल्या काळात नागपूरला हलवलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय पुन्हा अकोल्यात येणार आहे. याबाबत स्थानिक आमदार रणधीर सावरकर यांनी केलेल्या मागणीवर पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्देश दिले.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilAgrowon

Akola News : गेल्या काळात नागपूरला हलवलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय पुन्हा अकोल्यात येणार आहे. याबाबत स्थानिक आमदार रणधीर सावरकर यांनी केलेल्या मागणीवर पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्देश दिले.

२००२ पासून कार्यरत असलेले अकोला येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय नागपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. हे कार्यालय पूर्ववत अकोला येथे स्थलांतरीत करावे, असे पत्र आमदार सावरकर यांनी दिले होते.

Radhakrishna Vikhe Patil
Shetkari Sangh Election : शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी ७८ अर्ज, संघ वाचवण्यासाठी उमेदवारीची अनेकांची मागणी

अकोल्यातून हे कार्यालय मागील सरकारच्या काळात हलविल्यानंतर अनेक आंदोलने झाली. विधिमंडळातही हा प्रश्न गाजला. अकोल्यात कार्यालय होण्यास या नागपूर हिवाळी अधिवेशनात यश मिळाले.

अकोला येथे कार्यरत असलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय शासनाच्या आदेशानुसार ५ फेब्रुवारी २०२१ ला हलवण्यात आले. तत्कालिन महाविकास आघाडी शासनाने कोणतेही समर्थनीय कारण नसताना नागपूर येथे स्थलांतरीत केले.

Radhakrishna Vikhe Patil
Sahitya Akademi Award 2023 : कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’साठी साहित्य अकादमी पुरस्कार

राज्याच्या मागासलेल्या भागात संकरित पैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्ध उत्पादन व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस उत्तेजन देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली.

संस्थेचे मुख्यालय अकोला येथे २००२ पासून कार्यरत होते. येथे पशुधन विकास मंडळाची सुमारे २ हेक्टर जागा असून विकास मंडळाच्या कार्यालयासाठी अकोला जिल्हा नियोजन समितीमार्फत २०१९-२० मध्ये ६.१० कोटी रुपयेदेखील उपलब्ध करून देण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com