Water Source Agrowon
ॲग्रो विशेष

Water Source Inspection : अमरावती जिल्ह्यातील १६५२ जलस्रोतांची होणार तपासणी

Amravati ZP : अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १६५२ जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे.

Team Agrowon

Nagpur News : अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १६५२ जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पाण्याच्या गुणवत्तेनुसार ग्रामपंचायतींना लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड दिले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी दिली.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या मॉन्सूनपूर्व स्त्रोताची तपासणी केली जात आहे. यासाठी सर्व तालुक्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमून जलसुरक्षा रक्षक, गावातील पाण महिला आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यकांच्या सहकार्याने गोळा केले जात आहेत.

संकलित पाणी नमुन्यांची तपासणी भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेतून केली जाणार आहे. स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जलस्त्रोतांच्या पाण्यांमध्ये असलेल्या कमतरतेची माहिती मिळण्यास मदत होते. त्याआधारे उपाययोजना करणे शक्‍य होतात, हाच या मागील उद्देश असल्याचे संतोष जोशी यांनी सांगितले.

लाल कार्ड : पाणी शुद्धिकरणात अनियमितता.

हिरवे कार्ड : लाल कार्डाचे निकष आढळून येत नाही त्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते.

पिवळे कार्ड : मध्यम जोखीम म्हणून स्रोत निश्‍चित.

तालुकानिहाय स्रोतांची संख्या

अचलपूर १००

अमरावती १०९

अंजनगाव सुर्जी १२

भातकुली ७०

चांदूरबाजार ८०

चांदूररेल्वे १२०

चिखलदरा २५९

दर्यापूर १३

धामणगावरेल्वे ११७

धारणी २४१

मोर्शी १०२

नांदगाव खंडेश्‍वर १८८

तिवसा ११०

वरुड १३१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT