Maharashtra Drought: गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि पीकस्थितीच्या अचूक नोंदी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अधिकाऱ्यांना दिले. ३० सप्टेंबरपर्यंतची अंतिम पर्जन्यमानाची आकडेवारी, प्रत्यक्ष पीकस्थिती, पावसातील खंड आणि अन्य निर्धारित निर्देशकांच्या आधारे पुढील मूल्यांकन केले जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीच्या आधारे दुष्काळाबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही, असे यावेळी सांगण्यात आले..दुष्काळ परिस्थितीच्या आढाव्यासाठी झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम., पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते..Rohit Pawar Demands Drought Declaration: शेतीसमोर संकट अधिक गडद? तत्काळ दुष्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, १० मुद्दे केले उपस्थित.या वेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याचे सरासरी अपेक्षित पर्जन्यमान सुमारे १,३१६ मिलिमीटर असून, आतापर्यंत १,०७१ मिलिमीटर म्हणजे सुमारे ८१ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, तालुकानिहाय पर्जन्यमानात मोठी तफावत आहे. गडचिरोली, चामोर्शी, धानोरा आणि मुलचेरा या तालुक्यांत अद्याप सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. सप्टेंबरअखेर आणखी पाऊस झाल्यास या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे..Maharashtra Drought : विविध पक्ष, संघटनांकडून जिल्हा ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करण्याची मागणी.सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान हा महत्त्वाचा प्राथमिक निर्देशक आहे. तसेच जून-जुलैतील ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि दीर्घकाळचा पावसाचा खंड यांचाही विचार केला जातो. जिल्ह्यात सलग तीन ते चार आठवड्यांचा कोरडा खंड नोंदविण्यात आलेला नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली..चाऱ्याची टंचाई नाहीजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याने सद्यःस्थितीत चाऱ्याची टंचाई नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.