Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Hailstorm Crop Damage : गारपीट व वादळी पावसामुळे संत्रा मोसंबी बागायतदारांची आंबिया बहरातील फळांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Nagpur News : गारपीट व वादळी पावसामुळे संत्रा मोसंबी बागायतदारांची आंबिया बहरातील फळांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाने सर्वेक्षण न करता निरंक अहवाल दिल्याने नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.

नरखेड तालुक्यात एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक पार पडली. याच दरम्यान मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व काही भागात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संकटाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून व पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश वरिष्ठांकडून तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले होते.

परंतु तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना निरंक पाठविण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी निराशाच पदरी पडली आहे. तालुक्यातील अधिकाऱ्यांनी नुकसान निरंक दाखविले असल्याने पीकविमा कंपनीकडे तक्रार नोंदविल्यानंतरही शेतकऱ्यांची तक्रार कंपनी ग्राह्य धरत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या मुख्य जिल्हा व्यवस्थापकास लेखी आदेश द्यावेत.

Crop Damage
Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान कोटीच्या घरात आहे. निवडणूक कार्यात पूर्ण यंत्रणा गुंतलेली असताना निरंक नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आला. उलट शेतकऱ्यांच्या बांधावर कोणीच फिरकले नाही. ही वस्तुस्थिती आहे. संत्रा व मोसंबी या पिकावर आता गारपिटीने रोग दिसून येत असून फळ गळती सुरू आहे.

या फळ पिकांवर शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्नाचे नियोजन केल्या जाते. ‘वादळी व अवकाळी’ या बाबींवर विमा कंपनी नुकसान गृहीत धरले जाते. गारपिटीबाबत ज्यांनी पंधराशे रुपये अतिरिक्त भरणा केल्यानंतर विमा नुकसानीस पात्र ठरतो. या बाबत विमा कंपनीकडून ज्या सूचना केल्या गेल्या, त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती न मिळाल्यामुळे शेतकरी वंचित राहिले.

Crop Damage
Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

विमा हप्त्यातील तफावत कधी दूर होणार

मोसंबी ४ हजार रुपये प्रति हेक्टरी हप्ता भरून शेतकऱ्यांनी विमा उतरला. संत्रा फळांचे वीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रीमिअम भरून नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा उतरवण्यात आला. तर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १२ हजार रुपये प्रति हेक्टर व अकोला जिल्हा करिता ४ हजार रुपये दर ठरविण्यात आले.

शासनाकडून या तफावतीबाबत खुलासा झालेला नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांनी विमा फार अल्प प्रमाणात उतरविला आहे. कृषिमंत्र्यांनी प्रादेशिक समतोल धोरण निश्‍चित करून एकच विमा हप्ता दर ठरवीत विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनीकडून प्राप्त झाली नाही. एप्रिल महिना संपला आहे. शासनाकडून निधी विमा कंपनीला देण्यात आला व शासनाकडून जाहीर झाल्यानंतर ही विमा कंपनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का देत नाही, याबाबत पालकमंत्री यांनी नोंद घेण्याची गरज आहे
- वसंत चांडक, माजी सभापती (पंचायत समिती), नरखेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com