Government Fund  Agrowon
ॲग्रो विशेष

Government Fund : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे शासनाकडे अडकले १३५ कोटी

Zilla Parishad Fund : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे शासनाकडे सुमारे १३६ कोटी अडकले आहेत. त्यामुळे विकास कामांवर मोठा परिणाम झाला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे शासनाकडे सुमारे १३६ कोटी अडकले आहेत. त्यामुळे विकास कामांवर मोठा परिणाम झाला आहे. पदाधिकाऱ्यांकडून वारंवार निधीसाठी पाठपुरावा केला जात असूनही निधी देण्यासाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना पंधरावा वित्त आयोग, स्थानिक उपकर, मुद्रांक शुल्क, प्रोत्साहन अनुदान जमीन महसुल अनुदान आदींचा निधी शासनाकडून मिळतो. मात्र तो यंदा मिळाला नाही. त्यामुळे शासनाकडे १३५ कोटी रुपये अडकले आहेत.

या संस्थांवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाकडून विविध करांच्या माध्यमातून मिळणारी येणी वेळेवर येत नसल्याने सध्या शासनाकडे गेल्या दोन-तीन वर्षांपासूनचे सुमारे १३५ कोटींचे येणे थकीत आहे.

शासनाकडे अडकलेल्या निधीमध्ये मुद्रांक शुल्कचे १४ कोटी रुपये येणे आहे. स्थानिक उपकर, वाढीव उपकर, जमीन महसुल अनुदान, प्रोत्साहन अनुदानाचे सुमारे ३७ कोटी येणे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा निधी आला नसल्याने याचा बजेटवर परिणाम झाला आहे.

पंधराव्या वित्त आयोगाचे २२-२३ वर्षाचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर ४४ कोटी, तर २३-२४ चे ४४ असे सुमारे ८५ कोटी येणे आहे. २०२१ पासून जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगाचे ३६ कोटी ४९ लाख, पंचायत समित्यांना ३४ कोटी ९७ लाख तर ग्रामपंचायत्यांना ४७७ कोटी आले आहेत.

मार्चला तरी मिळणार का?

शासनाकडून आलेला निधी मार्चमध्ये खर्ची न पडल्यास तो परत जाण्याचा धोका असतो. त्यामुळे हा निधी खर्ची टाकण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असते. त्यामुळे शासनाकडे अडकलेला निधी मार्च महिन्यात मिळाला कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT