Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : पुणे विभागात खरिपाची १३२ टक्के पेरणी

Kharif Season : पुणे विभागात सुमारे सरासरीच्या १० लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी १४ लाख १ हजार ८७० हेक्टर म्हणजेच १३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Pune News : चालू वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे खरिपाच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात सुमारे सरासरीच्या १० लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी १४ लाख १ हजार ८७० हेक्टर म्हणजेच १३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत पेरणीच्या क्षेत्रात तीन लाख ३६ हजार ८२२ हेक्टरने वाढ झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. रब्बी हंगामही काहीसा अडचणीचा गेला होता. त्यातच हवामान विभागाने १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. खरिपात अनेक शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरणीवर भर दिला आहे.

तसेच यंदा वेळेवर सात जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सून दाखल झाल्यामुळे तूर, मूग, उडीद, कापूस, बाजरी या पिकांच्या पेरण्या वेळेवर केल्या गेल्या. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. विशेषतः सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात तब्बल दुपटीने वाढ झाली असून सुमारे तीन लाख ५८ हजार २७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सध्या नगरमधील अकोले व पुणे जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यात भात पिके वाढीच्या अवस्थेत असून, पीक परिस्थिती समाधानकारक आहे. बाजरी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पीक कणसामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मूग पीक काढणीस आले आहे. काही ठिकाणी पिकांवर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.

उडीद पीक पक्वतेच्या

अवस्थेत आहे. तूर पीक फुटवा येण्यासाठी शेंडे खुडण्याचे काम चालू आहे. सोयाबीन पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून काही प्रमाणात उंट अळी तसेच चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कापूस पीक फुले ते बोंड लागण्याच्या अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी पिकांवर मावा तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

जिल्हानिहाय झालेली खरिपाची पेरणी, हेक्टरमध्ये ः

जिल्हा -- सरासरी क्षेत्र -- पेरणी क्षेत्र -- टक्केवारी

नगर -- ५,७९,७६८ -- ७,१२,५१५ -- १२३

पुणे -- १,९५,७१० -- २,२१,२८५ -- ११३

सोलापूर -- २,८९,५७० -- ४,६८,०७० -- १६२

एकूण -- १०,६५,०४८ -- १४,०१,८७० -- १३२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT