Sangli News : सांगली जिल्ह्यात यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी वेळेत सुरू केली. हंगामात २ लाख ३३ हजार ८४३ हेक्टरवर पेरा झाला असून पेरणी आटोपण्याच्या मार्गावर आहे. यंदा उसाची १४ हजार ४७७ हेक्टरवर लागवड झाली आहे. मात्र, गत महिन्यापासून अतिवृष्टी, सतत पाऊस याचा फटका आडसाली ऊस लागवडीला बसला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर इतके आहे. यंदा जूनपासून पावसाचा सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्याचे नियोजन केले. जूनमध्ये ११७ टक्के पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. त्यानंतर जुलैमधील पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती.
त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. परंतु जुलैच्या मध्यापासून पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यानंतर शेतकरी पुन्हा पेरणी सुरू केल्या. यंदाच्या हंगामात २ लाख ३३ हजार ८४३ हेक्टरवर पेरा झाला आहे. खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली असून एकूण पेरणी ९४ टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मे महिन्यापासून कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांत आडसाली ऊस लागवडीचे नियोजन केले जाते. परंतु पाण्याची कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली नाही. जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर शेतकरी ऊसलागवडी करण्यासाठी पुढे आले. जुलैच्या मध्यापासून वाळवा, पलूस, मिरज आणि शिराळा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. वारणा, कृष्णा काठची शेती पाण्याखाली आली. त्यामुळे पावसाचा फटका ऊस लागवडीला बसला. सध्या शेतात पाणी साचून असल्याने वाफसा आल्याशिवाय ऊसलागवड करता येणार नसल्याने शेतकऱ्यांनी ऊसलागवडी थांबवल्या आहेत.
तालुकानिहाय खरीप हंगामातील पेरणी दृष्टिक्षेप
तालुका क्षेत्र (हेक्टर)
मिरज २१,८८८
जत ७३,४५१
खानापूर १५,०९९
वाळवा २०,९६०
तासगाव ३०,५४१
शिराळा १९,३१३
आटपाडी १४,४०३
कवठेमहांकाळ २१,७२९
पलूस ५,८४१
कडेगाव १०,६१७
एकूण २,३३,८४३
आडसाली ऊस
लागवड दृष्टिक्षेप
तालुका क्षेत्र (हेक्टर)
जत ३०
खानापूर ३,०२५
वाळवा ९,११८
तासगाव १,७५९
आटपाडी ९
पलूस ८०
कडेगाव ४५६
एकूण १४,४७७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.