Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : नांदेड विभागात १३ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Season : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २६ साखर कारखाने सुरू झाले आहेत.

Team Agrowon

Nanded News : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २६ साखर कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी मंगळवारअखेर (ता.२१) १३ लाख २६ हजार ५५६ टन उसाचे गाळप झाले. तर नऊ लाख ९८ हजार ७६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले, अशी माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून ‘गाळप हंगाम २०२३-२४’ साठी ३० कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील आजपर्यंत २९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे.

यातील २६ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. यात १८ खासगी तर आठ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. मंगळवारअखेर (ता. २१) १३ लाख २६ हजार ५५६ टन उसाचे गाळप केले आहे. तर यापासून नऊ लाख ९८ हजार ७६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ८.०४ टक्के आहे.

सुरू झालेले साखर कारखाने

नांदेड : सुभाष शुगर लिमिटेड, हडसणी, कुंटूरकर शुगर्स लिमिटेड, कुंटूर व भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, येहळेगाव, एमव्हीके ऍग्रो फुड्‌स प्रोडक्ट लि. वाघलवाडा, शिवाजी सर्व्हिस स्टेशन बाऱ्हाळी.

हिंगोली : कपिश्वर शुगर लि. बाराशिव, शिऊर साखर कारखाना लि. वाकोडी, टोकाई सहकारी साखर कारखाना, कुरुंदा, भाऊराव सहकारी साखर कारखाना डोंगरकडा.

परभणी : बळीराजा साखर कारखाना कानखेड, योगेश्वरी शुगर लि. लिंबा, रेणुका शुगर लि. पाथरी, लक्ष्मी नृसिंह शुगर, अमडापूर, टेवन्टीवन शुगर सायखेडा, गंगाखेड शुगर, तुळजा भवानी शुगर.

लातूर : मांजरा, विकास सहकारी, निवळी, विलास सहकारी तोंडार, रेणा सहकारी रेणापूर, संत शिरोमणी मारुती महाराज शुगर, सिद्धी शुगर, शिवाजी पाटील निलंगेकर शुगर, जागृती शुगर देवणी, श्री साईबाबा शुगर शिवणी, टेवन्टीवन शुगर माळवटी.

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन (गाळप टनांत, साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन

नांदेड पाच ०१,७०,६३० ०१,२६,५८०

लातूर १० ०५,२२,२९२ ०४,०८,१६०

परभणी सात ०५,०१,७३० ०३,७०,९२०

हिंगोली चार ०१,३१,९०४ ९३,१००

एकूण २६ १३,२६,५५६ ०९,९८,७६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी

Maharashtra Heavy Rainfall: अतिवृष्टीचा ३० जिल्ह्यांना फटका

Sanyukt Kisan Morcha: शेतकरी आत्महत्या हे संघटनांचे अपयश

e-POS Fertilizer Sales: ई-पॉस प्रणालीद्वारे खतांची विक्री करणे बंधनकारक

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार

SCROLL FOR NEXT