Pune News: नारायणगाव येथील पाटे–खैरे मळा शिवारात शुक्रवारी (ता. २६) सकाळी अकराच्या सुमारास गव्हाच्या शेतात दोन बिबट्यांमध्ये सुरू असलेल्या झुंजीने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. हे दृश्य पाहून शेतात काम करणारे शेतकरी व मजूर भयभीत झाले होते..बिबट्यांच्या आवाजाने हा संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट देऊन बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी शुक्रवारी दुपारी दोन वाजता पिंजरा लावण्यात आला आहे, अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, सुशांत भुजबळ यांनी दिली..Leopard Attack: डहाणूत बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू.नारायणगाव (ता. जुन्नर) येथील पाटे- खैरे मळा शिवारातील धोंडिभाऊ खैरे यांच्या साधारणपणे एक फूट वाढलेल्या गव्हाच्या शेतात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास बिबट्यांची झुंज सुरू झाली. बिबट्यांच्या आवाजामुळे परिसर दणाणून गेला. या वेळी येथे काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला. बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. त्यानंतर दोन्ही बिबटे जवळच्या उसाच्या शेतात निघून गेले..मात्र या घटनेमुळे शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नारायणगाव वनपरिक्षेत्रातील आर्वी, गुंजाळवाडी, वारूळवाडी, मांजरवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव परिसरात बिबट्यांचे दर्शन नित्याचे झाले आहे. दोन ते तीनच्या संख्येने बिबटे फिरताना दिसत आहेत..Leopard Terror: शिरूर अनंतपाळ तालुक्यात बिबट्याची दहशत?.बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी १८ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी बिबटे मानवी वस्तीत भक्ष्याच्या शोधात फिरत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर रोज व्हायरल होत आहेत. या भागात अनेक पाळीव कुत्रे व शेळ्या, मेंढ्या, वासरे आदी पशुधन बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहे..वारूळवाडी येथे शेतात काम करीत असणारी महिला, खडकवाडी येथील मेंढपाळ, नारायणगाव येथील तरुण बिबट हल्ल्यात जखमी झाला आहे. बिबट नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून शासनाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.