Farmer Protest: शासनाने जाहीर केलेले दुधाचे अनुदान आणि चारा छावण्यांची प्रलंबित बिले अद्याप न मिळाल्याने राज्यातील पशुपालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यासंदर्भात किसान आर्मी या संघटनेने आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयासमोर दुधाचे कॅन फेकून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.