Sugarcane Crushing Season : परभणी जिल्ह्यात २७ हजार हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Sugarcane Production : कृषी विभागाकडील माहितीनुसार परभणी जिल्ह्यात गतवर्षी (२०२२-२३) लागवड झालेला २७ हजार ९३७ हेक्टरवरील ऊस यंदाच्या (२०२३-२४) हंगामात साखर कारखान्यांना गाळपासाठी उपलब्ध होणार आहे.
sugarcane crushing season
sugarcane crushing season Agrowon

Parbhani News : कृषी विभागाकडील माहितीनुसार परभणी जिल्ह्यात गतवर्षी (२०२२-२३) लागवड झालेला २७ हजार ९३७ हेक्टरवरील ऊस यंदाच्या (२०२३-२४) हंगामात साखर कारखान्यांना गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. यंदा जुलै, ऑगस्टमधील पावसाच्या खंडामुळे तसेच एकंदरीत पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे उसाच्या उत्पादकतेत घट येत आहे.

परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ऊस लागवड आहे. जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील तसेच गोदावरी नदी काठच्या तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यातील पूर्वहंगामी उसाचे क्षेत्र ६ हजार ९७६ हेक्टर आहे. सुरू उसाचे क्षेत्र ८ हजार ८७५ हेक्टर, तर खोडवा उसाचे क्षेत्र १२ हजार ८६ हेक्टर आहे.

sugarcane crushing season
Sugarcane Season : स्वाभिमानी संघटनेने रोखली ऊस वाहतूक

जिल्ह्यात पाथरी तालुक्यांमध्ये २, तसेच परभणी, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, सेलू तालुक्यात प्रत्येकी १ असे एकूण ७ साखर साखर कारखाने आहे. नांदेड येथील साखर सहसंचालक कार्यालयाकडील माहितीनुसार साखर कारखान्याकडील नोंद व कृषी विभागाकडील नोंदी यांचे संयुक्तपणे निश्‍चित केलेले अंदाजित ऊस लागवड क्षेत्र ५० हजार ८१६ हेक्टर आहे.

sugarcane crushing season
Sugarcane FRP : उद्यापर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा महामार्ग अडविणार

प्रतिहेक्टरी ६० टन उत्पादकतेनुसार ३० लाख ४८ हजार ९६० टन उत्पादन अपेक्षित आहे. परंतु कमी पावसामुळे उसाच्या उत्पादकतेत १० टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्हा (२०२२-२३)मधील ऊस लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका पूर्वहंगामी सुरू खोडवा एकूण क्षेत्र

परभणी ९२० ५८४ २२८० ३७८४

पाथरी ३२६५ ३३२६ ४४४४ ११०३५

मानवत ३४१ ५१९ ७८८ १६४८

सोनपेठ ६५१ ६७३ १११७ २४४०

गंगाखेड ६२० ९४० २९० १८५०

पूर्णा १०२३ २८३३ २२७३ ६१२९

पालम ०० ०० ८६० ८६०

सेलू १५६ ०० ३५ १९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com