Food Processing Industry  Agrowon
ॲग्रो विशेष

Processing Industry : प्रक्रिया उद्योगास १२ हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

Food Processing : ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार तरुण, शेतकरी, महिला यांना प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाकडून ‘पीएमएफएमई’ योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

सुर्यकांत नेटके

Nagar News : कृषी विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून (पीएमएफएमई) यावर्षी राज्यातील १२ हजार शेतकरी, तरुण उद्योजक, महिलांना शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. याशिवाय ६३४ शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांना प्रक्रिया उद्योगांना अनुदान मिळणार आहे. यासाठी ३१७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.

ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार तरुण, शेतकरी, महिला यांना प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाकडून ‘पीएमएफएमई’ योजना राज्यात राबविण्यात येत आहे. कृषी उत्पादनाची वर्गवारी, प्रतवारी, साठवणूक करण्यासाठी जागा व इमारत आदींसाठी अनुदान दिले जाते.

‘पीएमएफएमई’तून वैयक्तिक शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला ३५ टक्के व कमाल दहा लाख रुपये, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना लाभ (इनक्युबेशन केंद्र, मूल्यसाखळी) ३५ टक्के व कमाल दहा कोटी, मार्केटिंग व ब्रॅडिंगमधील शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, स्वयंसाह्यता गट आणि त्यांचे फेडरेशन यांना प्रकल्पाच्या ५० टक्के अनुदान दिले जाते.

यावर्षी वैयक्तिक १२ हजार शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांना मिळून ६३४ तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ व अन्य महिला संस्थांना १६ प्रकल्पांचा लाभ दिला जाईल. सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अशी लाभार्थी निवड होईल.

गतवर्षी पाच जिल्हे आघाडीवर

‘पीएमएफएमई’तून लाभार्थी निवड व लाभ देण्यात गेल्यावर्षी ७३ टक्के लक्षांक साध्य झाला आहे. त्यातही नगर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, वर्धा व नाशिक हे पाच जिल्हे आघाडीवर राहिले. योजनेचे हे शेवटचे वर्ष असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.

यंदासाठी लक्ष्यांक (वैयक्तिक शेतकरी, कंपन्या, गट)

ठाणे ः ३०१, पालघर ः २४०, रायगड ः ३०९, रत्नागिरी ः ४२६, सिंधुदुर्ग ः ३०१, मुंबई ः १४, मुंबई उपनगर ः २५, नाशिक ः ४९९, धुळे ः २३६, जळगाव ः ४९७, नंदुरबार ः ३०१, नगर ः ४९९, पुणे ः ४९९, सोलापूर ः ४३१, कोल्हापूर ः ४३१, सांगली ः ४९३, सातारा ः ४२९, छत्रपती संभाजीनगर ः ६१६, बीड ः २४३, जालना ः २४१, हिंगोली ः ३००, लातूर ः ३६७, नांदेड ः ४३५ , धाराशिव ः ३०३, परभणी ः ३०८, अकोला ः३०५, अमरावती ः ४३३, बुलडाणा ः ४३२, वाशीम ः २९३, यवतमाळ ः ४३४, भंडारा ः २४१, चंद्रपूर ः ४३६, गडचिरोली ः २०४, गोंदिया ः २३३, नागपूर ः ४३४, वर्धा ः ३०५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT