Success Story: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुकळवाड (ता. मालवण) येथील हर्षल हिंदळेकर यांनी २००६ मध्ये कोणतेही कर्ज न घेता प्रशिक्षणातून प्रकिया उद्योग सुरू केला. कच्च्या मालाची निवड, स्वाद, चव व गुणवत्ता यात कायम सातत्य ठेवत १९ वर्षांच्या कालावधीत हर्ष या ब्रॅण्डची प्रक्रिया उत्पादने लोकप्रिय केली आहेत. म्हणूनच पंचवीस लाखांच्या वार्षिक उलाढालीपर्यंत टप्पा गाठणे शक्य झाले आहे. .सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई- गोवा महामार्गावर कसाल ते मालवण मार्गावर सुकळवाड गाव आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध मालवण शहर व समुद्रकिनाऱ्यापासून काही किलोमीटरवरील या गावात भातासह आंबा, काजू, कोकम, सुपारी ही मु3ख्य पिके आहेत. या भागातील मुख्य अर्थकारण पर्यटनावरच आधारित आहे. लाखो पर्यटक दरवर्षी या भागात येतात. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. सुकळवाड गावातील ग्रामस्थ देखील पर्यटनाला पूरक व्यवसायांवर अधिक भर देतात..याच गावातील हर्षल हिंदळेकर यांचे घर व तीन एकर शेती आहे. वडील विजय व आई दर्शना सेवानिवृत्त शिक्षक असल्याने त्यांचे संस्कार हर्षल यांच्यावर झाले. त्यातूनच कणकवली येथे एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईत शाळेत मुलाखतीसाठी बोलावणे आले. परंतु मुंबईला जाण्यादिवशीच नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळे वेळेत पोहोचणे शक्य झाले नाही. नोकरीची संधी गमवावी लागली. परंतु त्यानंतर मात्र नोकरीपेक्षा स्वतःचा उद्योगच सुरू करावा असे हर्षल यांना वाटू लागले. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले..Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती.प्रशिक्षणातून प्रक्रिया उद्योगाची सुरुवातप्रकिया उद्योगात करिअर करावे असे ठरले. परंतु कोणती उत्पादने निवडावीत याबाबतचा अद्याप काही ठरत नाही. अखेर प्रसिद्ध उद्योजक सुरेश बोवलेकर यांची भेट घेतली. त्यांनी कोकणातील स्थानिक फळांवर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी असा सल्ला दिला. त्यानुसार कुटुंबीयांशी चर्चा झाली. त्यांच्याकडूनही होकार आल्यानंतर पुढील मार्ग मोकळा झाला..त्यानंतर माणगाव येथील डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पात प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. दीड महिना निवासी प्रशिक्षण घेतले. या कालावधीत कोकणातील विविध फळांपासून विविध उत्पादने निर्मितीचा अनुभव प्रात्यक्षिकांसह घेता आला. त्यातून आत्मविश्वास वाढीस लागला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर काही दिवस कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथेही अनुभव घेतला.येथील डॉ. विकास धामापूरकर यांच्याकडून उद्योगातील बारकावे जाणून घेतले..उद्योगाला सुरुवातप्रशिक्षण आणि काही ठिकाणी घेतलेल्या अनुभवानंतर पहिल्या टप्प्यात आंबा आणि कोकमवर प्रकिया करण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक लागणारी यंत्रसामग्री कुडाळ येथील एका फर्ममधून तयार करून घेतली. सन २००६ मध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उद्योगाला शुभारंभ केला. सुरुवातीला काही अडचणी आल्या. उत्पादनांमध्ये काही कमतरता राहात होत्या. परंतु अभ्यास, कौशल्यवृद्धी यातून बदल घडत गेला..जोपर्यंत उत्पादनाला उत्तम चव, स्वाद व गुणवत्ता प्राप्त होत नाही तोपर्यंत बाजारपेठेत ते सादर करायचे नाही असा अलिखित नियमच ठरवून घेतला. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करणे व उत्तम सेवा या गोष्टींच्या जोरावर बाजारपेठेत उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी आपसूकच वाढू लागली. सुरुवातीला खूप कमी प्रमाणात उत्पादनांची निर्मिती व्हायची. मात्र उद्योगक्षेत्रात होणारे बदल, पॅकेजिंग, ग्रेडिंग, लेबलिंग तसेच नवी उत्पादने,नवे ‘ट्रेंड’, संशोधन यांचा सातत्याने अभ्यास करीत गेल्याने उद्योगाचा विस्तार करणे सोपे गेले..Fruit Processing : फळ प्रक्रिया उद्योगातील संधी.हर्ष ब्रॅण्डने उत्पादने सादरआज हर्षल यांचा प्रकिया उद्योगात १९ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. कोकमचे सरबत व आगळ, आवळ्यापासून सरबत, ज्यूस, पेठा, मावा, आंब्यापासून पल्प, सरबत, कैरी पन्हे, जांभळाचा ज्यूस तसेच काही स्क्वॅश आदी उत्पादनांची निर्मिती होते. हर्ष असा ब्रॅण्ड तयार केला आहे. दरवर्षी एकूण सुमारे सहा- सात टन कच्चा माल लागतो. पैकी बहुतांश माल स्थानिक शेतकऱ्यांकडूनच घेण्यात येतो. ग्राहकांच्या मागणीनुसार अर्धा, एक लिटर, पाच लिटर व ७५० मिलि असे पॅकिंग केले जाते..उल्लेखनीय उलाढालउद्योगाच्या सुरुवातीला अडीच ते पाच लाखांपर्यंत केवळ वार्षिक उलाढाल होती. सन २०२३ व २४ मध्ये ती २० व २३ लाखांपर्यंत तर यंदाच्या वर्षी २५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. सर्व उत्पादने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुकानदारांकडे उपलब्ध केली आहेत. पर्यटनाला या भागात मोठा वाव असल्याने या स्थळांच्या ठिकाणी स्टॉलवर उत्पादनांना मागणी असते. ऑनलाइन पद्धतीने विक्री तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणीही माल वितरित होतो. बोवलेकर उद्योगसमूहाने उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यात मोलाचे सहकार्य केले आहे..कुटुंबाची मदत व सहकार्यहर्षल यांच्यासह उद्योगात वडील विजय, आई दर्शना, पत्नी वेदा या सर्वांचा मोठा हातभार लागतो. प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून घेतली आहे. मुलगा निहार सध्या विद्यार्थिदशेत आहे. बहीण पूजाची देखील उद्योग वाढविण्यात मोलाची मदत झाल्याचे हर्षल यांनी सांगितले. तिचा अलीकडेच विवाह झाला आहे. सर्व कुटुंब एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदते हेच आमच्या यशाचे रहस्य असल्याचे हर्षल सांगतात..झालेले सन्मानशेतकऱ्यांनी शेतीसह प्रक्रिया उद्योगात केलेली उल्लेखनीय कामगिरी या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसकडून २०१५ मध्ये हर्षल यांचा यशस्वी उद्योजक म्हणून सन्मान करण्यात आला आहे. तर २०१८ मध्ये जिल्हा उद्योग केंद्रांकडून उद्योग क्षेत्रातील पुरस्काराने गौरव झाला आहे. हर्षल हे सिंधुदुर्ग जिल्हा फळप्रक्रिया उत्पादक संघाचे खजिनदार म्हणूनही कार्य करतात. त्यामुळे संघाच्या प्रगतीसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांत त्यांचा पुढाकार असतो..कर्जाविना विस्तारलेला उद्योगहर्षल यांनी पाच लाख स्वगुंतवणुकीतून उद्योगाला सुरवात केली. आज सहाशे चौरस फूट इमारतीत वर्षभर उद्योग कार्यरत आहे. फळांचे काप करणारे यंत्र, ड्रायर तसेच अन्य सर्व आवश्यक यंत्रसामग्री तसेच पदार्थांच्या पृथक्करणासाठी प्रयोगशाळा आहे. कधीही कर्ज घेतले नाही. दरवर्षी मिळणाऱ्या नफ्यातील ४० टक्के रक्कम उद्योगवृद्धीसाठी वापरली जाते. कच्चा मालाच्या खरेदीसाठी स्वतंत्र आर्थिक नियोजन केले जाते. हर्षल यांनी उद्योगातून स्वतःसोबत चार स्थानिकांना देखील बारमाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शिवाय हंगामाच्या उच्च काळात काही स्थानिकांनाही रोजगार देण्यात येतो.हर्षल हिंदळेकर ९४२२३९३७३०, ९४२०७३२२८१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.