Dairy Processing Industry : विद्यार्थ्यांनो, दुग्धप्रक्रिया उद्योजक होऊया...

Dairy Production : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (परभणी) कृषी महाविद्यालयांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कार्यरत आहे. येथे विद्यार्थ्यांना विविध दुग्धप्रक्रिया निर्मिती व विक्री कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
Dairy Processing
Dairy Processing Agrowon
Published on
Updated on

Dairy Entrepreneurs : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा़ कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय व पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कार्यरत आहे. त्यामध्ये कृषी पदवीच्या अंतिम वर्षाच्या आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभवातून शिक्षण (एक्सप्रियन्सिएल लर्निंग प्रोग्रॅम-ईएलपी) हा उपक्रम राबविला जातो.

त्यात दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येते. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून या प्रकल्पासाठी २००६ मध्ये ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर म्हशीचा सुसज्ज व स्वच्छ गोठा तसेच प्रक्रिया उत्पादने निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे.

पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण

दरवर्षी जानेवारी ते मे या कालावधीत हा उपक्रम घेण्यात येतो. हा कालावधी मागे-पुढेही होऊ शकतो. यात दरवर्षी ३० ते ४० विद्यार्थी सहभागी होतात. प्रकल्प १५ ऑगस्ट, २००८ रोजी कार्यान्वित झाला. त्यानंतर आजमितीस सुमारे सहाहजार विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. घरच्या घरी दोन ते तीन तासांत तसेच सहजरीत्या बनविता येतील असे व रोजची मागणी असलेले असे खवा, पनीर व बासुंदी हे तीन पदार्थ आहेत.

त्यांच्या निर्मिती प्रशिक्षणावर अधिक भर असतो. कारण याच पदार्थांपासून पुढील मिठाईचे किंवा अन्य पदार्थ तयार होतात. त्याशिवाय आइस्क्रीम, श्रीखंड, गुलाबजाम, रसगुल्ले, पेढे आदींची निर्मितीदेखील शिकवली जाते. बदाम, केशर, साखर, वेलची, जायफळ आदी घटकांची खरेदी बाजारातून होते. येथील यंत्रसामग्री आधुनिक असून ती वर्षभर सुरू ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे प्रक्रिया प्रकल्पात बाराही महिने उत्पादन निर्मिती सुरू असते.

Dairy Processing
Dairy Business : मांजरा पट्ट्यात शिंदे यांचा प्रेरणादायी दुग्ध व्यवसाय

विक्रीचे कौशल्य

केवळ उत्पादन निर्मितीचे ज्ञान असून चालत नाही. कारण बाजारपेठेत त्याच्या पॅकिंगला महत्त्व असते. त्याचबरोबर आपले उत्पादन बाजारपेठेत चालावे यासाठी ग्राहकासोबत संवाद, त्याच्या अडचणी, ‘फीडबॅक’ समजून घेणे गरजेचे असते. त्यादृष्टीने विद्यार्थी या गोष्टींमध्येही कुशल होण्यासाठी प्रयत्न केला जातो.

व्यावसायिक विक्री हा येथे उद्देश नसतो. विद्यापीठाच्या प्रक्षेत्राबाहेर कोठेही विक्री होत नाही. तर येथे भेट देणाऱ्या व्यक्ती उत्पादनांची खरेदी करतात. विद्यापीठ आवारात कृषी प्रदर्शने, शिवार फेरी या प्रसंगी स्टॉल उभारून तेथेही विद्यार्थ्यांना विक्रीचा अनुभव मिळतो. एकूण विक्रीतून विद्यापीठास महसूल प्राप्त होतो.

शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ.गजेंद्र लोंढे यांचे ‘ईएलपी’ उपक्रमाला मार्गदर्शन लाभले आहे. उपक्रमाचे प्रभारी अधिकारी समन्वयक डॉ.नरेंद्र कांबळे असून, क्षेत्र व पशुधन संगोपन प्रभारी अधिकारीपदी डॉ.दत्ता बैनवाड कार्यरत आहेत.

शेतकरी व महिला गटांनाही दुग्ध प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते. पाच वर्षांत एक हजारांवर व्यक्तींनी त्याचा लाभ घेतला आहे. खासगी कृषी महाविद्यालये, शाळा, शेतकरी यांच्या अभ्यास सहली येथे येतात. माफसू तसेच अन्य कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनीही येथे भेट दिली आहे.

Dairy Processing
Dairy Business : पुन्हा जागविली नवी उमेद

उत्पादनांची गुणवत्ता

येथील खवा ३४० रुपये, पनीर ४०० रुपये, तर बासुंदी ३०० रुपये दराने विकली जाते. गणेश उत्सवाच्या काळात पेढ्यांना मागणी असते. त्या वेळी दररोज १० ते १५ किलो पेढे तयार करून विक्री केली जाते.

कार्यानुभव शिक्षण उपक्रमाचे प्रभारी अधिकारी समन्वयक डॉ. नरेंद्र कांबळे म्हणतात, की काही व्यक्तींना हे दर महागडे वाटतात. परंतु विद्यापीठातील गोठ्यातील दूध दर्जेदार असून त्यात कोणती भेसळ नसते. जनावरांना देखील अधिकाधिक सेंद्रिय पद्धतीचाच चारा देण्यात येतो. त्यामुळे प्रक्रिया उत्पादनांची गुणवत्ता सेंद्रिय पद्धतीसारखीच असते.

डेअरी फार्म

गोठ्यामध्ये ४० मुऱ्हा म्हशी आहेत. दररोज सुमारे २० ते २५ लिटर दुधावर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करून दाखविण्यात येते. उर्वरित दुधाचा पुरवठा विद्यापीठातील विविध विभागांतील संशोधन वा प्रयोगांसाठी होतो.

दुधाची विक्री येथील अधिकारी, कर्मचारी, ग्राहकांना प्रति लिटर ७० रुपये दराने होते. दोन हेक्टरवर बहुवार्षिक चारा पिकांची लागवड केली आहे. त्यामुळे वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो. बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सुमारे सात हेक्टरवर ज्वारी असून त्यापासूनही कडबा उपलब्ध होते.

डॉ. नरेंद्र कांबळे ७५८८५६८२३९ (ईलपी, प्रभारी अधिकारी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com