Ujani Dam agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणात तासाला १२ मेगावॅट विजनिर्मीती, ५ दिवसात १५ लाख युनिट वीज तयार

Ujani Dam Solapur : उजनी धरण सध्या १०५ टक्के भरले असून सध्या भीमा नदीतून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सोडून दिला जात आहे.

sandeep Shirguppe

Ujani Dam Overflow : उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आणि वीजनिर्मितीच्या प्रतीक्षेतील धरणावरील विद्युत प्रकल्प सुरू झाला. ४ ते ९ ऑगस्ट या अवघ्या पाच दिवसांतच तीन मिलियन युनिट विजेची निर्मिती झाली आहे. प्रत्येक तासाला १२ मेगावॉट वीज तयार होत आहे.

उजनी धरण सध्या १०५ टक्के भरले असून सध्या भीमा नदीतून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सोडून दिला जात आहे. दौंडवरून धरणात १२ हजार क्युसेकची आवक आहे. या पार्श्वभूमीवर धरणातून १६०० क्युसेक पाणी विद्युत प्रकल्पासाठी सोडले जात आहे.

त्यातून दररोज तीन लाख युनिट वीज तयार होत आहे. यंदा उजनीच्या पाण्यावर २५ मिलियन युनिट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट्य आहे. आतापर्यंत पाच दिवसांत १५ लाख युनिट वीज तयार झाली आहे. दौंडवरून येणारा विसर्ग सुरूच असल्याने पावसाचा अंदाज व दौंडचा विसर्ग पाहून नदीत सोडून दिले जाणारे पाणी बंद की सुरूच ठेवायचे, याचा निर्णय होईल.

तत्पूर्वी, जानेवारीतच उणे झालेले धरण २५ जुलैपर्यंत प्लसमध्ये आलेले नव्हते. पुणे जिल्ह्यातील मुळशी, कासारसाई, चासकमान, पवना, खडकवासला, वीर यासह इतर धरणांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आणि उजनी धरणात दौंडवरून मोठा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे अवघ्या १२-१५ दिवसांतच उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आणि धरणावरील विद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू झाली.

शेतीला मिळू शकते एक आवर्तन जास्त

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या समांतर जलवाहिनीचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून दरवर्षी सोडले जाणारे २० ते २२ टीएमसी पाणी सोडावे लागणार नाही.

दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक उपसा सिंचन योजनांची कामे सुरू असून संपूर्ण कामे व्हायला आणखी काही दिवसांचा काळ जाणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या उन्हाळ्यात गरजेनुसार शेतकऱ्यांना एक आवर्तन जास्त मिळू शकते. त्याचे नियोजन पावसाळा संपल्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित होईल, असे ‘जलसंपदा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT