Agrowon Podcast : कापसाचा बाजार दबावातच ; कापूस, सोयाबीन, तूर तसेच आल्याचे दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हळध, टोमॅटो आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture Market Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीन आणखी नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील नरमाई कायम आहे. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनचे वायदे पुन्हा नरमले. सोयाबीनचे वायदे शुक्रवारी ९.८७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३१९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसू दबावातच

कापसाचा भाव आजही दबावातच आहेत. जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये सध्या अनिश्चित परिस्थिती आहे. त्यामुळे कापसाच्या मागणीवर परिणाम झाला. मागणी घटली आणि विक्री वाढल्याचा परिणाम कापसावर दिसून येत आहे. कापसाचा भाव गेल्या चार वर्षातील सर्वाच निचांकी पातळीवर कायम आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६८.३८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : हळद भाव सुधारणा अपेक्षित; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच काया आहेत टोमॅटो दर

आल्यातील चढ उतार कायम

आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ५ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.       

Agriculture Market
Soybean Market : नवा हंगाम तोंडावर तरीही सोयाबीनचे भाव स्थिरच

तुरीमध्ये काहीशी नरमाई

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.    

लसणाचे भाव नरमले

राज्यात लसणाचे भाव नरमले आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com