Dharashiv News : जिल्ह्यात ऊस गाळपाचा हंगाम सध्या मध्यावर आलेला आहे. बारा साखर कारखान्यांनी सोमवारपर्यंत (ता. २०) १२ लाख ६३ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर, १९ लाख ४८ हजार टनांवर उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंतचा सरासरी साखर उतारा ६.४९ टक्के आला आहे.
रांजणीच्या ‘नॅचरल शुगर’ने सर्वाधिक तीन लाख ४३ हजार ६० टन उसाचे गाळप केले आहे; तसेच तीन लाख चार हजार २०० क्विंटल साखर उत्पादित करून यातही याच कारखान्याने मोठी आघाडी मिळविलेली आहे. मंगरूळच्या कंचेश्वर कारखान्याने एक लाख ८० हजार ६८० टन ऊस गाळप केले आहे. गाळपाच्या तुलनेत उच्चांकी एक लाख ९६ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादित करून सर्वाधिक ११ टक्के साखर उतारा मिळविला आहे.
समुद्राळचा भाऊसाहेब बिराजदार कारखाना ३.४ टक्के साखर उतारा घेत सर्वात मागे राहिला आहे. जिल्ह्यातील एकूण १२ साखर कारखान्यांपैकी पाच सहकारी कारखान्यांनी आठ लाख ४७ हजार ३८३ टन उसाचे गाळप करून पाच लाख ३९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सहकारी कारखान्यांचा साखर उताऱ्याची टक्केवारी ६.३६ टक्के आला आहे.
तर खासगी सात कारखान्यांनी ११ लाख ६४९ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. या कारखान्यांनी ७ लाख २४ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पाच सहकारी कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता १९ हजार ७५० टनांची आहे. तर खासगी साखर कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ३० हजार ५०० टन इतकी आहे. जिल्ह्याची एकूण ऊस गाळप क्षमता ५० हजार २५० टन आहे.
ढोकी येथील भैरवनाथ साखर कारखान्याने एक लाख ७ हजार ६३५ टन उसाचे गाळप करीत ७३ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादित केली. त्याचा साखर उतारा ७.२९ टक्के आला असून, कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता पाच हजार टन आहे. मुरूमच्या विठ्ठलसाई कारखान्याने एक लाख ४५ हजार ९८५ टन उसाचे गाळप करीत एक लाख ४४ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
अरविंदनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याने एक लाख ७७ हजार २४८ टन उसाचे गाळप करून एक लाख ५० हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. वाशीतील भैरवनाथ कारखान्याने ७६ हजार ८५५ टन ऊस गाळप केला आहे. त्यापासून ६८ हजार ३०० क्विंटल साखर निर्मिती केली आहे.
समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने तीन लाख ३९ हजार ६६० टन ऊस गाळप करून एक लाख एक हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. इडा जवळ्यातील बाणगंगा कारखान्याने दोन लाख २१ हजार टन उसाचे गाळप केले आहे.
पारगावच्या भीमाशंकर मिल्सने ४७ हजार ८५० टन ऊस गाळप करून ३९ हजार ६८० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. चोराखळीतील धाराशिव कारखान्याने ८३ हजार ६६० टन ऊस गाळप करीत ६६ हजार ५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सोनारीतील भैरवनाथ शुगरने एक लाख १७ हजार टन ऊस गाळप करून ६० हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
खेडच्या लोकमंगल माउली कारखान्याने ८६ हजार ७५० टन उसाचे गाळप करीत ५७ हजार ७२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. मंगरूळच्या कंचेश्वरने एक लाख ८० हजार ६८० टन ऊस गाळप केले आहे. त्यापासून उच्चांकी एक लाख ९६ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादित करून सर्वाधिक ११ टक्के साखर उतारा मिळविला आहे.
एकूण ऊस गाळप स्थिती ...
कारखाने क्षमता (टन) गाळप उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)
सहकारी ५ १९७५० ८४७३८३ ५३९००० ६.३६
खासगी ७ ३०५०० ११००६४९ ७२४५५० ६.५८
एकूण १२ ५०२५० १९४८०३२ १२६३५५० ६.४९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.