Akola News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात अवजारे बँक, मालवाहतूक वाहने वितरित केली आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी अनियमितता झाल्याचा प्रकार चौकशीत समोर आलेला आहे.
या प्रकरणी संबंधित शेतकरी गट, कंपन्यांसह जबाबदार अधिकाऱ्यांना नोटीस बजावत बाजू मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे. सुमारे ११६ नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. यापैकी काही जणांकडून नोटिशीला उत्तरे दिली जाऊ लागली आहेत.
प्रकल्पातून वितरित झालेल्या अवजारे बँका, वाहन वितरणाची गेल्या काळात बुलडाणा जिल्ह्यातील पथकांकडून चौकशी करण्यात आली होती. या दरम्यान बऱ्याच ठिकाणी यंत्र, अवजारे मिळाली नव्हती. याबाबत चौकशी अहवालात संबंधित गट, शेतकरी कंपनीनिहाय याचा तपशील सादर करण्यात आला.
यावर वरिष्ठांकडून वसुलीच्या अनुषंगाने जिल्हा यंत्रणेला तातडीने नोटीस बजावण्याचे निर्देश दिले गेले. यानंतर अंमलबजावणी यंत्रणेने तपशीलवार प्रत्येक गट, कंपनीला नोटीस दिली आहे.
त्यात अनिययमितेचा तपशील, संबंधित यंत्रासाठी घेतलेल्या अनुदानाची किंमत आदी स्पष्ट करण्यात आले. चौकशी समितीने आक्षेप ठेवलेली यंत्रे तेव्हा दिसून न आल्याचे सबळ कारण सादर करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.
चौकशी समितीने १६४ अवजारे बँकांची तपासणी केली होती. त्यापैकी केवळ ४६ अवजारे बँकांच्या ठिकाणी अवजारे सुस्थितीत होती. ११६ गट, कंपन्यांकडे मंजुरीपेक्षा कमी अवजारे आढळून आली. याचा स्पष्ट उल्लेख चौकशी समितीने अहवालात केल्यानंतर हे प्रकरण गंभीर झाले आहे.
या यंत्र, अवजारांसाठी शासनाचे तीन कोटी ६४ लाख रुपयांचे अनुदान काढण्यात आले आहे. त्यामुळे आता एकतर यंत्र-अवजारे दाखवा, लेखी उत्तर द्या, असे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत अत्यंत कमी प्रमाणात उत्तरे आलेली आहेत.
यात संबंधितांनी आमची अवजारे तेव्हा बाहेर गेल्याने दाखवता आली नाहीत. आता तुम्ही या व यंत्रे बघा, असे अधिकाऱ्यांना लेखी कळविले आहे. काही गटांनी अवजारे खरेदी केली किंवा नाही याबाबत संशय आहे. त्यामुळे या नोटीस प्रकरणातून तथ्ये बाहेर येण्याची शक्यता आहे.
खुलासा न दिल्यास कारवाई ः
नोटीस बजावलेल्यांनी लेखी उत्तर द्यावे. त्यातून समाधान न झाल्यास संबंधितांविरुद्ध अनुदान वसुलीची कारवाई केली जाईल. अनुदान परत न केल्यास संबंधितांच्या सातबारावर बोझाजा चढविला जाण्याची कारवाई करण्याच्या मानसिकतेत प्रशासन आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.