Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत ११ टक्के पाणीसाठा

Water Level : परभणी जिल्ह्यातील ४ लघू प्रकल्प तलाव कोरडे पडले आहेत, तर ९ लघू प्रकल्पांच्या तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील २२ पैकी ९ लघू प्रकल्पांमध्ये गुरुवारी (ता.१) सरासरी ९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. जिल्ह्यातील ४ लघू प्रकल्प तलाव कोरडे पडले आहेत, तर ९ लघू प्रकल्पांच्या तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

दोन मध्यम प्रकल्पात सरासरी ११ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. उपयुक्त पाणीसाठा संपलेल्या तलावांवर अवलंबून असलेल्या गावात पाणीटंचाई जाणवत आहे. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे होणार आहे.

गतवर्षीच्या (२०२३) पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात अल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व २२ लघू तलावांमध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध होता. नोव्हेंबर महिन्यातील मान्सूनोत्तर पावसामुळे अनेक तलावातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. उपसादेखील काही दिवस बंद राहिला.

तापमानात घट झाली. बाष्पीभवनाचा वेग कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा गेल्या काही दिवसांत फारशी घट कमी झाली होती. परंतु परत उपसा झाला. बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत आहे.

जिल्ह्यातील लघू ९ प्रकल्पांमध्ये गुरुवारी (ता.१) सरासरी ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यात पेडगाव (ता.परभणी) येथील तलावात ४ टक्के, आडगाव (ता.जिंतूर) येथील तलावात ११ टक्के, पाडाळी(ता.जिंतूर) येथील तलावात २ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

आंबेगाव (ता.मानवत) येथील तलावात ३ टक्के, झरी (ता.पाथरी) येथील तलावात ६६ टक्के, पिंपळदरी (ता.गंगाखेड) येथील तलावात १८ टक्के, राणीसावरगाव (ता.गंगाखेड) येथील तलावात ४९ टक्के, टाकळगाव (ता.गंगाखेड) येथील तलावात ९ टक्के, तांदुळवाडी (ता.पालम) येथील तलावात ३७ टक्के पाणीसाठा होता.

कोरडे पडेलेल्या तलावात देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चारठआणा हे चार लघू तलाव आहेत. जोत्याखाली पाणी गेलेल्यातलावात वडाळी, चिंचोली, केहाळ, भोसी, कवड, मांडवी, दहेगाव (सर्व ता.जिंतूर), नखावाडी (ता.सोनपेठ), कोद्री (ता.गंगाखेड) या ९ लघू तलावांतील साठा जोत्याखाली गेला आहे.

मध्यम प्रकल्पात ११ टक्के पाणीसाठा

परभणी जिल्ह्यातील निवळी (ता.जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयात गुरुवारी (ता.१) पर्यंत ४.५७४ दलघमी (१८ टक्के) तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये १.०७ दलघमी (४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता आहे. दोन्ही प्रकल्पात सरासरी ११ टक्के पाणीसाठा आहे.

गतवर्षी (२०२२) याच तारखेला करपरा मध्यम प्रकल्पात ६८ टक्के, तर मासोळी मध्यम प्रकल्पात ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता असा दोन्ही प्रकल्पात सरासरी ७१.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT