Narendra Modi  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Variety : जैवसंवर्धनयुक्त पिकांच्या १०९ वाणांचे लोकार्पण

Climate Friendly Crop Varieties : हवामानाशी जुळवून घेणाऱ्या जैवसंवर्धनयुक्त अशा १०९ वाणांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. ११) पुसा कॅम्पसमध्ये करण्यात आले.

Team Agrowon

New Delhi News : हवामानाशी जुळवून घेणाऱ्या जैवसंवर्धनयुक्त अशा १०९ वाणांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. ११) पुसा कॅम्पसमध्ये करण्यात आले. ६१ पिकांच्या १०९ वाणांचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर मोदी यांनी शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांशी संवाद साधला. लोकार्पण करण्यात आलेल्या वाणांमध्ये सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब केंद्राने विकसित केलेल्या "सोलापूर अनारदाना"चाही समावेश आहे.

कंदवर्गीय पिके, भरडधान्ये, गवतवर्गीय पिके, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस, तंतूमय पिके, मसाला व औषधवर्गीय पिके, फुले, फळे आणि भाजीपाल्यासह अन्य पिकांचे वाण भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) विकसित केले आहेत. जास्त उत्पन्न देणारे हे वाण हवामानाशी जुळवून घेणारे आहेतच. पण ते जैवसंवर्धन युक्त आहेत. ६१ पिकांपैकी ३४ शेतवर्गीय पिके असून २७ फलोद्योग श्रेणीतील पिके आहेत.

आयसीएआरने विकसित केलेल्या विविध पिकांच्या या वाणांमुळे शेतीचा खर्च कमी होईलच, पण त्यामुळे पर्यावरण संवर्धन देखील होईल, असे मोदी यांनी यावेळी संवाद साधताना सांगितले. शेतकऱ्यांनी मूल्यवर्धित शेतीकडे लक्ष देण्याची वेळ आली आाहे.

पौष्टिक आणि जैविक खाद्य विकल्पाच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मोदी यांनी नमूद केले. उन्नत वाण तयार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या कृषी वैज्ञानिकांचे मोदी यांनी कौतुक केले. व्यापक प्रमाणात हे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोचावेत, यासाठी दरमहा या वाणांची माहिती दिली जावी, असेही मोदी म्हणाले.

"सोलापूर अनारदाना" वैशिष्ट्यपूर्ण

महाराष्ट्रातून सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या सोलापूर अनारदाना या वाणाचे प्रसारण या कार्यक्रमात झाले. हे वाण वैशिष्ट्यपूर्ण असून, विशेषतः उच्च-गुणवत्तेच्या अनारदाना (सुके डाळिंबाचे बी) उत्पादनासाठी विकसित केले गेले आहे, मऊ बियांमुळे, गडद लाल दाण्यांमुळे आणि उच्च रसांमुळे तिला वेगळी चव आहे.

आकाराने मध्यम ते मोठ्या आकाराची फळे मिळतात, ज्याचे वजन सुमारे २५० ते ३०० ग्रॅम असते आणि प्रत्येक झाडामध्ये दरवर्षी सरासरी १८ ते २० किलो उत्पादन होते. प्रक्रिया उद्योगासाठी हे वाण उपयुक्त आहे. दिल्लीतील या कार्यक्रमाला सोलापुरातून डाळिंब केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिनेश बाबू उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT