Pomegranate Variety : ‘सोलापूर अनारदाना’, वाणाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Solapur Anardana : संपूर्ण देशात डाळिंब प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात येणारे हे पहिलेच वाण आहे. सध्याच्या स्थितीत अनारदाना तयार करण्यासाठी डाळिंबाच्या ‘नाना’ या जंगली जातीचा वापर करण्यात येतो.
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या डाळिंबाच्या नव्या ‘सोलापूर अनारदाना’ या वाणाचे आज (ता.११) नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होईल.

या कार्यक्रमात भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत देशभरात कार्यरत विविध संशोधन संस्थांनी विकसित केलेली विविध फळे आणि पिकांची १०९ वाणे प्रसारित केली जाणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील ‘सोलापूर अनारदाना’ या वाणाचा समावेश आहे.

नवी दिल्ली येथील संशोधन केंद्राच्या पुसा येथील ‘आयएआरए’च्या प्रक्षेत्रात आज सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल. संपूर्ण देशात डाळिंब प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात येणारे हे पहिलेच वाण आहे. सध्याच्या स्थितीत अनारदाना तयार करण्यासाठी डाळिंबाच्या ‘नाना’ या जंगली जातीचा वापर करण्यात येतो. परंतु त्याची तयार अनारदाण्याची रिकव्हरी अत्यंत कमी आहे.

Pomegranate
Telya Disease Pomegranate : शेतकऱ्यांसमोर नवं संकट, डाळिंब बागेत ‘तेल्या’चा धुमाकूळ, सांगलीचे शेतकरी हैराण

ही बाब विचारात घेऊन संशोधन केंद्राने ‘सोलापूर अनारदाना’ हे खास प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरणारे पहिले डाळिंबाचे वाण संशोधित केले. संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. दिनेश बाबू यांनी त्यासाठी योगदान दिले. गेल्या काही वर्षांपासून त्यावर काम सुरू होते. दोन वर्षांपूर्वी ते प्रायोगिक स्वरूपात त्याची प्रात्यक्षिकेही घेतली आहेत. महाराष्ट्रासह शेजारील राज्यांच्या कोरड्या, अर्ध-कोरड्या प्रदेशांसाठी ते फायदेशीर ठरेल.

Pomegranate
Pomegranate Production : गौडवाडीचा डाळिंब उत्पादन पॅटर्न प्रेरणादायी

‘सोलापूर अनारदाना’ची गुणवैशिष्ट्ये

- उच्च-गुणवत्तेच्या अनारदाना (सुके डाळिंबाचे बी) उत्पादनासाठी हे वाण फायदेशीर.

- मऊ बियांमुळे, गडद लाल दाण्यांमुळे आणि उच्च रसामुळे त्याला विशिष्ठ ओळख.

- फळे मध्यम ते मोठ्या आकाराची मिळतात, ज्याचे वजन सुमारे २५० ते ३०० ग्रॅमपर्यंत राहते.

- प्रत्येक झाडामध्ये दरवर्षी सरासरी १८ ते २० किलो उत्पादन हमखास होते.

- या दाण्यांचा स्वाद गोड-आंबट आहे, ज्यामुळे ताजे सेवन, अनारदानामध्ये प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरते.

सोलापूर अनारदाना हे वाण आमच्यासह शेतकऱ्यांसाठी डाळिंबाच्या शेतीत प्रगतिपथावरील एक मोठे आश्‍वासक पाऊल म्हणून समोर येत आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हे वाण फायदेशीर ठरणार आहेच, पण प्रक्रिया उद्योगातही सोलापूर अनारदाना हे वाण उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनात एक नवा मापदंड निर्माण करेल.
- डॉ. राजीव मराठे, केंद्र संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com