Urea Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Shortage : जळगाव जिल्ह्यात १०.२६.२६, युरिया खते दुरापास्त

Fertilizer Demand : खतांच्या वापरात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. खतांची मागणी यंदा वाढणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खतांच्या वापरात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. खतांची मागणी यंदा वाढणार आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात युरिया व १०.२६.२६ या खतांची समस्या किंवा टंचाई, लिंकिंग सुरू आहे.

जिल्ह्यात खरिपातील खतपुरवठा सुरू आहे. त्यात खतांचा साठा विविध कंपन्यांनी केला आहे. तसेच कृषी विभागदेखील खतांचा संरक्षित (बफर) साठा केला आहे. परंतु युरिया व १०.२६.२६ ही खते अपवाद वगळता उपलब्ध नसल्याची माहिती आहे. गेल्या हंगामात खतांची मोठी टंचाई सुरुवातीपासून होती. १०.२६.२६, युरिया, दाणेदार सुपर फॉस्फेट ही खते दुरापास्त झाली होती.

तशीच स्थिती यंदाही तयार झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चढ्या दरात ही खते ग्रामीण भागात व शहरातील खत विक्रेत्यांकडे घ्यावी लागत आहेत. पुरवठा कमी व मागणी अधिक, अशी स्थिती आहे. ही समस्या मागील खरिपात दूर झालीच नव्हती. यंदाही ती तूर होईल की नाही, असा प्रश्‍न आहे.

खतपुरवठादार कंपन्यांकडून खतांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, असा दावा मात्र केला जात आहे. नव्या हंगामासाठी जिल्ह्यात सुमारे सव्वातीन लाख टन रासायनिक खतांची आवश्यकता असणार आहे. याबाबतचा पुरवठा लक्ष्यांक कृषी विभागाने मंजूर करून घेतला आहे. यात युरियाचा सुमारे एक लाख ३५ हजार टन पुरवठा होईल. नव्या हंगामासाठी आवश्यक खतांमध्ये मिश्र व सरळ खतांचा पुरवठा सुरू झाला आहे. त्यात पोटॅश, फॉस्फेटचा पुरवठा झाला आहे.

आठवड्यातून काही दिवस विविध कंपन्यांकडून खतपुरवठा होत आहे. फॉस्फेटची देखील चांगली मागणी असणार आहे. फॉस्फेटचा हंगामात सुमारे ४० हजार टन पुरवठा होणार आहे, अशी माहिती मिळाली. परंतु युरिया व १०.२६.२६ ची मागणी अधिक आहे. ही खते नसल्याने शेतकरी अन्य मिश्र खतांचा उपयोग करीत आहेत. जिल्ह्यात कापूस पिकाचे क्षेत्र सर्वाधिक पाच लाख ५५ हजार हेक्टर एवढे असणार आहे.

या वर्षी मका पिकांचे क्षेत्रही अधिक राहील. तृणधान्य व गळीतधान्याचे क्षेत्र स्थिर राहणार आहे. तसेच केळीचे क्षेत्रही किंचित वाढणार आहे. केळीसह कापूस पिकाला खतांची मोठी आवश्यकता असते. ही मागणी जून ते ऑगस्ट यादरम्यान अधिक असते. यामुळे खतांचा अधिकाधिक पुरवठा करून घेण्यावर प्रशासनाचा भर असावा, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Processing Project: शेतकरी गटाचा धान पट्ट्यात टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प

Sugaracne Payment: लोकनेते देसाई कारखान्याकडून तीन हजारांची पहिली उचल

Human Wildlife Conflict: बिबट्याला मारायची परवानगी द्या

Yatra Management: कार्तिकी यात्रेदरम्यान मंदिर परिसरात वाहनांना बंदी

NCCF Transport Issue: ‘एनसीसीएफ’ वाहतूक निविदा प्रक्रियेत पक्षपात, अनियमिततेचे आरोप

SCROLL FOR NEXT