Groundwater Level Update Agrowon
ॲग्रो विशेष

Groundwater Level : मराठवाड्यात भूजल पातळीत १ ते ३ मीटरपर्यंत घट

Decrease in Groundwater Level : जलसाठ्यांमधील पाणी झपाट्याने आटत असतानाच मराठवाड्यातील भूजल पातळीही मार्च अखेरच्या निरीक्षणानुसार घटली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : जलसाठ्यांमधील पाणी झपाट्याने आटत असतानाच मराठवाड्यातील भूजल पातळीही मार्च अखेरच्या निरीक्षणानुसार घटली आहे. मागील पाच वर्षांतील मार्चअखेरच्या सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत ७६ पैकी ५१ तालुक्यांत १ ते ३ मीटरपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त घट झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी, लातूर, धाराशिव त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, जालना, हिंगोली अशी क्रमाने भूजल पातळीत भूजल सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षणात घट दिसते आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नऊ, जालन्यातील तीन, परभणीतील आठ, हिंगोलीतील दोन, नांदेड मधील एक, लातूरमधील दहा, धाराशिवमधील आठ व बीडमधील १० मिळून तब्बल ५१ तालुक्यांत भूजल पातळीत घट नोंदविली गेली आहे.

८७५ विहिरींचे निरीक्षण

मार्च अखेर मराठवाड्यातील ८७५ विहिरींचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १४१, जालनामधील ११०, परभणीमधील ८६, हिंगोलीतील ५५, नांदेडमधील १३४, लातूरमधील १०९, धाराशिव मधील ११४ व बीड मधील १२६ विहिरींचा समावेश आहे.

परभणी जिल्ह्यात सर्वाधिक घट..

भूजल सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षणानुसार परभणी जिल्ह्यात मागील पाच वर्षांतील मार्चअखेर भूजलची सरासरी पातळी ६.४९ मीटर इतकी होती. आता मार्च अखेरच्या निरीक्षणानुसार ती ८.७७ मीटर इतकी खोल गेली आहे. त्या पाठोपाठ लातूर जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ६.८५ मीटर इतकी होती. ती ८.९८ मीटर इतकी खोल गेली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ९.२५ मीटर इतकी होती. ती आता १०.९९ मीटर खोलीवर गेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ९.३९ मीटर होती ती १०.८६ मीटर खोलीवर गेली आहे. बीड जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ८.०४ मीटर इतकी होती, ती आता ८.४७ मीटर खोलीवर गेली आहे.

नांदेड जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ७.७८ मीटर इतकी होती. ती आता ७.५६ मीटर खोलीवर गेली आहे. जालना जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ९.२३ मीटर इतकी होती ती आता ९.२५ मीटर खोलीवर गेली आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ८.४३ मीटर इतकी होती ती आता ८.४१ मीटर खोल गेली आहे.

...अशी आहे घट निहाय तालुके संख्या

० ते १ मीटर पर्यंत भूजल पातळी खाली गेलेल्या तालुक्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ३, जालना, हिंगोली, धाराशिवमधील प्रत्येकी २, लातूर ३, बीडमधील ५, नांदेडमधील एका तालुक्याचा समावेश आहे.

एक ते दोन मीटरपर्यंत पाणीपातळी खोल गेलेल्या तालुक्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर व बीडमधील प्रत्येकी ४, जालना, लातूरमधील प्रत्येकी एक, परभणीतील ३, धाराशिवमधील २ तालुक्यांचा समावेश आहे.

दोन ते तीन मीटरपर्यंत भूजल पातळी खोल गेलेल्या तालुक्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २, परभणीतील ३, लातूर व धाराशिवमधील प्रत्येकी चार व बीडमधील एका तालुक्याचा समावेश आहे.

तीन मीटरपेक्षा जास्त पाणीपातळी खोल गेलेल्या तालुक्यांमध्ये परभणी व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन तालुक्यांचा समावेश आहे.

नांदेड वगळता पर्जन्यमानातही तूटच

जून ते सप्टेंबर २०२३ दरम्यान मराठवाड्यात सरासरी ६७५.४३ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ५७१.०७ मिलिमीटर पाऊस झाला जो सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ८४.५५ टक्के राहिला. पडलेल्या पर्जन्यमानात नांदेड वगळता सर्व जिल्ह्यांत ७ ते ३० टक्क्यांपर्यंत घट राहिली आहे.

शून्य ते एक मीटर भूजल पातळी घटलेले तालुके

छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पैठण, घनसावंगी, अंबड, हिंगोली, औंढा नागनाथ, कंधार, लातूर, उदगीर, देवणी, धाराशिव, लोहारा, अंबाजोगाई, शिरूर कासार, गेवराई, माजलगाव, आष्टी.

एक ते दोन मीटरपर्यंत भूजल पातळी घटलेले तालुके ः फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, परतुर, पूर्णा, पालम, जिंतूर, जळकोट, कळंब, भूम, केज, धारूर, परळी, वडवणी.

दोन ते तीन मीटरपर्यंत भूजल पातळी घटलेली तालुके ः खुलताबाद, वैजापूर, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ, रेणापूर, निलंगा, अहमदपूर, चाकूर, परंडा, तुळजापूर, उमरगा, वाशी

तीन मीटरपेक्षा जास्त भूजल पातळी घटलेले तालुके ः मानवत, सेलू, औसा, शिरूर

भूजल पातळीत वाढ झालेले तालुके

जालना, बदनापूर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, वसमत, कळमनुरी, सेनगाव,नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, लोहा, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर,देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, मुखेड आणि पाटोदा.

जिल्हानिहाय भूजल पातळीतील घट (मीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर १.४७

जालना ०.०२

परभणी २.२८

हिंगोली ०.०१

नांदेड ०.२२

लातूर २.१३

धाराशिव १.७४

बीड ०.४४

जिल्हानिहाय पर्जन्यमानातील घटीचा टक्का

छत्रपती संभाजीनगर ७.९९

जालना २१.६७

परभणी ३०.३२

हिंगोली ६.६३

लातूर २५.४७

धाराशिव २७.०४

बीड २४.४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT