दीपक पालवे, डॉ. संदीप लांडगे, डॉ.लक्ष्मण तागडओट पिकाचा पाला हिरवागार पौष्टिक असून खोड देखील मऊ, रसाळ व लुसलुशीत असते. चाऱ्यात कोणतेही अपायकारक द्रव्ये नसल्याने तो कोणत्याही अवस्थेत जनावरांना खाऊ घातला तरी धोका निर्माण होत नाही. लागवडीसाठी फुले हरिता, फुले सुरभी, केंट युपिओ -०१-१ , जे. एच.ओ.२००४-४ जे एच.ओ.७२२ या वाणांची लागवड करावी..ओट हे गहू पिकासारखे दिसणारे परंतु गव्हापेक्षा थोडे उंच वाढणारे महत्त्वाचे चारा पीक आहे. काही भागात या पिकास सातू असे म्हणतात. या पिकास थंड हवामान चांगले मानवते. हा चारा हा पोषक आणि चविष्ट असून त्याचा वापर जनावरांना हिरवा चारा, भुसा अथवा मुरघास म्हणून सुध्दा केला जातो. ओट हे १५० सेंमी पर्यंत उंच वाढणारे भरपूर फुटवे देणारे पीक आहे..पाला हिरवागार पौष्टिक असून खोड देखील मऊ, रसाळ व लुसलुशीत असते. त्यामुळे हिरवा चारा जनावरे आवडीने खातात. चाऱ्यात कोणतेही अपायकारक द्रव्ये नसल्याने तो कोणत्याही अवस्थेत जनावरांना खाऊ घातला तरी धोका निर्माण होत नाही. दुभत्या जनावरांना या पिकाचा चारा दिल्यास दुधाच्या प्रमाणात वाढ होतेच शिवाय दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण वाढते..Green Fodder: रब्बी हंगामातील चारा पिकांची लागवड .ओट हे चारा पीक क्षारयुक्त अथवा पाणथळीच्या जमिनी वगळून इतर सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन या पिकास चांगली मानवते. खत व पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास हलक्या जमिनीमध्ये लागवड यशस्वीरित्या करता येते. मात्र अशा जमिनीत चाऱ्याचे उत्पादन थोडे कमी मिळते.ओट हे थंड हवामानात चांगले येते. कमी अथवा जास्त दमट हवामान या पिकास अपायकारक आहे..हे तंतुमय मुळे असणारे पीक आहे. जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी एक खोल नांगरट करून १ ते २ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमिनीचा चढ-उतार लक्षात घेता पिकास समप्रमाणात पाणी देण्याच्या दृष्टीने ६ ते ७ मीटर लांब आणि ३ ते ४ मीटर रुंद वाफे तयार करावेत..पिकास थंड हवामान चांगले मानवत असल्याने पेरणीपासून ते फुटवा येईपर्यंत पिकास जास्तीत जास्त थंडीचा कालावधी मिळणे आवश्यक आहे. दुसरी कापणी चांगली येण्याकरिता पेरणी नोव्हेंबर पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणीसाठी हेक्टरी १०० किलो उत्तम प्रतीचे बियाणे वापरावे. पेरणी ३० सेंमी अंतरावर करावी किंवा बियाणे फोकून सारे पडावेत,दंड पाडून पाणी द्यावे..Green Fodder Crop: बरसीम आणि ओट या बहुवार्षिक चारा पिकांचे लागवड तंत्र.सुधारित वाण : फुले हरिता, फुले सुरभी, केंट युपिओ -०१-१ , जे. एच.ओ.२००४-४ जे एच.ओ.७२२हिरवा चारा उत्पादनासाठी योग्य खतांची मात्रा वेळेवर देणे गरजेचे आहे. पेरणीपूर्वी हेक्टरी ३ ते ४ टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. एक कापणी घ्यावयाची असल्यास पेरणीपूर्वी हेक्टरी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्टरी ४० किलो, पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी खुरपणीनंतर द्यावा..दुसऱ्या कापणीस योग्य असणारे वाण उदा. फुले हरिता (आर.ओ.-१९), केन्ट या करिता हेक्टरी १२० किलो नत्र तीन समान हप्त्यात म्हणजे ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि ४० किलो नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे. उर्वरित ४० किलो नत्र पहिली कापणी झाल्याबरोबर द्यावे, म्हणजे उत्पादनात वाढ मिळते..पीक तण विरहित ठेवण्यासाठी एक खुरपणी ३० दिवसाच्या आत करावी.जमिनीच्या प्रतीनुसार, पीक वाढीच्या अवस्थेनुसार दर १० ते १२ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. मावा नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के फवारावा.एकच कापणी घ्यावयाची असेल तर पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात असताना (पेरणीपासून ७० ते ७५ दिवसांनी करावी. या पिकाचे हेक्टरी ४०० ते ४५० क्विंटल उत्पादन मिळते. चारा वाळवून किंवा भुसा करून ठेवता येतो..दुबार कापणीस योग्य असणाऱ्या वाणाची पेरणी ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.पहिली कापणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी आणि दुसरी कापणी ४५ ते ५० दिवसांनी केल्यास हेक्टरी ५५० ते ६०० क्विंटल हिरवा चारा मिळतो.- दीपक पालवे९४०३४८९२२६(अ.भा.स.चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.