Ground Water Level : गडचिरोली जिल्ह्यात भूजल पातळीत घट

Water Shortage : उन्हाचा पारा वाढत असतानाच पाणीटंचाईचे संकटही जिल्हाभरात गडद होत असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील सरासरी पाणीपातळीत ०.०६ मीटरने घट नोंदविण्यात आली आहे.
Water Level Decreased
Water Level DecreasedAgrowon
Published on
Updated on

Gadchiroli News : उन्हाचा पारा वाढत असतानाच पाणीटंचाईचे संकटही जिल्हाभरात गडद होत असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील सरासरी पाणीपातळीत ०.०६ मीटरने घट नोंदविण्यात आली आहे.

गेल्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने खंड दिला. त्यानंतरच्या काळात अतिवृष्टी व पावसाची संततधार अनुभवण्यात आली. ऑक्टोबर महिना मात्र कोरडा गेला. त्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात काही ठिकाणी मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. जानेवारी २०२४ मध्ये सुद्धा अवकाळी पावसाची नोंद जिल्ह्याच्या काही भागात झाली.

Water Level Decreased
Ground Water Survey : पर्जन्यमान वाढले, पण भूजल घटले

काही भागात ढगाळ वातावरणाची स्थिती होती. आता तापमानात वाढ होत असल्याने प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. भुगर्भातील साठ्यावरही याचा परिणाम होत असल्याने पाणीटंचाईचे संकटही गडद होणार आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने ११२ गावांतील विहिरींच्या पातळीचे निरीक्षण करण्यात आले.

Water Level Decreased
Ground Water : अतिखोल भूजलस्रोतांचे पुनर्भरण आवश्यक

त्याद्वारे भूजल पातळी सरासरी ०.०६ मीटरने घटल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील २०५ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून १२.७० कोटी रुपयांचा आराखडा तयारक करण्यात आला आहे. प्र जिल्ह्यातील २०५ गावे पाणीटंचाई सदृश आहेत. यामध्ये ८४ गावे तर १२९ लहान गावे/पाडे यांचा समोवश आहे. यातील सर्वाधीक १५ गावे गडचिरोली तालुक्‍यातील असून अहेरी तालुक्‍यातील १२, तसेच कुरखेडा व धानोरा तालुक्‍यातील प्रत्येकी ११ गावांचा समावेश आहे.

पाणीपातळीत घट

गेल्या पाच वर्षातील सप्टेंबर महिन्यातील सरासरी पाणीपातळीचा विचार केला असता जानेवारी २०१९ मध्ये ५.३५ मीटर, जानेवारी २०२१ मध्ये ५.४५, जानेवारी २०२४ मध्ये ५.०९ मीटर याप्रमाणे नोंदविण्यात आला. गेल्या पाच वर्षातील पाणीपातळीची जानेवारी महिन्यातील सरासरी ०.०६ मीटरने घटल्याचे निरीक्षण भूजल सर्व्हेक्षण विभागाने नोंदविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com