Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance: सातारा जिल्ह्यात पीकविमा योजनेला कमी प्रतिसाद

Kharif Season: एक रुपयात पीकविमा योजना शासनाने बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी आता सुधारित पीकविमा योजनेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी ४० हजार अर्ज दाखल झालेले आहेत.

Team Agrowon

Satara News: एक रुपयात पीकविमा योजना शासनाने बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी आता सुधारित पीकविमा योजनेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी ४० हजार अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये माण, खटाव, कऱ्हाड, वाई तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पीकविमा घेण्यात आघाडी घेतली आहे.

पीकनिहाय वेगवेगळी विमा हप्ता रक्कम असल्याने शेतकऱ्यांनी या नवीन विमा योजनेकडे पाठ फिरवण्याचे चित्र आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सवलतीच्या दरात म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती.

पहिल्या दोन वर्षे या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला. काही शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाईही मिळाली; पण काही जिल्ह्यांत नुकसान होऊनही शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरपाई दिली गेली नाही. काही ठिकाणी बोगस पीकविमा भरल्या गेला. यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

त्यामुळे शासनाने या वर्षी एक रुपयात पीकविमा योजना बंद करून पूर्वीप्रमाणे पीक कापणी प्रयोगावर आधारित योजना लागू केली. या योजनेत पीकनिहाय विमा हप्ता रक्कम ठरली असून, ती शेतकऱ्यांना भरावी लागत आहे. मुळात एक रुपयात पीकविमा योजना असूनही त्याकडेही अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती.

आता विमा हप्ता रक्कम भरायची असल्याने शेतकऱ्यांचा योजनेला फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. आतापर्यंत १५ हजार ५३२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. त्यांच्याकडून ४० हजार ४४५ अर्ज भरले गेले आहेत. त्यातून १३ हजार ११५ हेक्टर खरीप पिकांचा विमा उतरवला गेला आहे. 

...अशी आहे स्थिती

पीकविमा योजनेत सहभागी तालुकानिहाय शेतकरी संख्या अशी : जावळी ४०१, कऱ्हाड १०४४, खंडाळा ७७५, खटाव ३२०३, कोरेगाव ४९०, महाबळेश्‍वर २५, माण ६४७६, पाटण ७६०, फलटण ६८७, सातारा ४८०, वाई ११९१. एकूण १५ हजार ५३२.

पीकविमा घेण्यासाठी खरिपातील अंतिम मुदत १४ ऑगस्टपर्यंत आहे. सध्या बदलत्या  हवामानामुळे खरीप पिके अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेता नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.
- अजय शेंडे, कृषी अधिकारी, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Flood : पूरबाधित ४० गावांतील नुकसानग्रस्त घरांच्या तातडीने याद्या तयार करा

Pomegranate Crop Damage : सांगली जिल्ह्यात डाळिंबाचे नुकसान

Seena River Flood : पूरग्रस्त गावातील पशुधनाला चारा वाटप

Girna Dam : गिरणा धरणात पाण्याची आवक

Bajari Crop : बाजरी पक्वतेच्या मार्गावर; पीकही जोमात

SCROLL FOR NEXT