Crop Insurance Delayed: विमा हप्ता थकल्याने भरपाई मिळेना

Delayed Payouts: विमा कंपन्यांना हप्त्यापोटी एक हजार कोटींवर रक्कम राज्य सरकारने वेळेत न दिल्याने भरपाई थकल्याची कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली.
Crop Insurance Delayed
Crop Insurance DelayedAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: विमा कंपन्यांना हप्त्यापोटी एक हजार कोटींवर रक्कम राज्य सरकारने वेळेत न दिल्याने भरपाई थकल्याची कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली. या वेळी विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी विविध विषयांवरील विरोधकांचे मुद्दे खोडून काढले.  

राज्य सरकारने विमा हप्ता वेळेत न भरल्याने २०२३-२४ मधील खरीप व रब्बी हंगामातील विमा भरपाईची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही रक्कम आठ दिवसांत कंपन्यांना दिली जाईल, त्यानंतर भरपाईची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही ते म्हणाले.

Crop Insurance Delayed
Crop Insurance: पीक विमा योजनील महत्वाचे ३ बदल कोणते?

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी बाकावरील अन्य सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना मंत्री कोकाटे बोलत होते. २०१६-१७ ते २०२३-२४ या काळात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत एकूण ४३ हजार २०१ कोटी ३३ हजार विमा हप्ता जमा झाला. या काळात शेतकऱ्यांना ३२ हजार ६२९ कोटी ७३ लाख रुपये भरपाई मिळाली.

Crop Insurance Delayed
Crop Insurance: पुरवणी मागण्यांवर चर्चेदरम्यान शेतकऱ्यांसाठी सत्ताधाऱ्यांना धरलं धारेवर

या काळात विमा कंपन्यांना एकूण ७ हजार १७३ कोटी १४  लाख रुपयांचा नफा झाल्याची माहितीही श्री. कोकाटे यांनी दिली. विमा कंपन्यांनी सरकारला २ हजार ३२२ कोटी ६१ लाख रुपयांचा परतावा दिला आहे. खरीप २०२४ मधील ४०० कोटी रुपयांचा पीकविमा देणे बाकी आहे. राज्याने सुमारे १०२८.९७ कोटी रुपयांचा पीकविमा हप्त्याची रक्कम भरलेली नाही, त्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. 

सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीसाठी स्वतंत्र परवाने

राज्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. आता सेंद्रिय खते, औषधे आणि संजीवकांच्या विक्रीसाठी स्वतंत्र परवाने देण्याचा विचार आहे, अशी माहिती श्री. कोकाटे यांनी दिली. एचटीबीटी वाहतूक, साठवणूक विक्री, हाताळणी केल्यामुळे पोलिसांत ५४ गुन्हे दाखल आहेत. तसेच २१७.७७ लाख रुपयांचे बियाणे जप्त केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com