Monsoon Update
Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : परतीचा माॅन्सून कुठवर पोचला?

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्यात पावसाचा जोर (Rain Intensity) आता काहीसा ओसरला. अनेक भागात पावसानं (Rainfall) उघडीप दिली. मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. तर माॅन्सूनचा परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) आज रखडला होता. तसचं हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) व्यक्त केलाय.

शुक्रवारी मॉन्सूनने संपूर्ण छत्तीसगड, आडिशा, विदर्भाच्या बहुतांश भागासह आंध्र प्रदेशाच्या काही भागातून मुक्काम हलवला होता. तर डहाणू, बुलढाणा, काकीनाडा, रामगुंडम पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला. मात्र आज माॅन्सूनचा प्रवास थांबला होता. तर माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये माॅन्सून देशाचा निरोप घेईल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.

राज्यात आज पावसाचं प्रमाण कमी झालं होतं. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये विजांसह जोरदार पावसानं हजेरी लावली. तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि नगर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार सरी झाल्या. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा अधिक होता. पुणे जिल्ह्यातही ठिकठिकाणी सरी पडल्या.

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील अनके मंडळांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. विदर्भातही काही भागांमध्ये पावसाच्या सरी पडल्या. बुलडाणा जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. तर वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यात तसचं मराठवाड्यातील औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

SCROLL FOR NEXT