Water Crisis  Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : टँकरची शतकाकडे वाटचाल

Water Scarcity : पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील टंचाईच्या भीषणतेत वाढ होत असून, पाण्याच्या टँकरची शतकाकडे वाटचाल सुरू आहे.

Team Agrowon

Satara News : पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील टंचाईच्या भीषणतेत वाढ होत असून, पाण्याच्या टँकरची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात ९२ गावे व ४३२ वाड्यावस्त्यांवर ९७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईच्या झळा सर्वाधिक माण तालुक्याला बसत असून, या तालुक्यात पाण्यासाठी तब्बल ६४ टँकर सुरू आहेत.

जिल्ह्यातील अनेक मंडलांत २१ दिवसांहून आधिक पाऊस झालेला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. उशिरा पेरण्या झालेली पिके सुकली आहेत. पावसाच्या गैरहजेरीमुळे पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होऊ लागले आहे. यामुळे टँकरच्या मागणीत वाढ होत असल्याने टँकरची शतकराकडे वाटचाल होऊ लागली आहे.

सध्या प्रशासनाकडून जिल्ह्यातील ९२ गावे व ४३२ वाड्यावस्त्यांवरील एक लाख ३८ हजार ८८५ लोकांना ९७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ८६ हजार ६८१ पशुधनही या पाणीटंचाईने बाधित आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक झळा बसत आहेत. माण तालुक्यात ६४ टॅंकरद्वारे ५१ गावे ३७२ वाडीवस्तीवर पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्यात १२ टँकरद्वारे १९ गावे २४ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात १२ टॅंकरद्वारे नऊ गावे ३६ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात ८ टँकरद्वारे दहा गावांत पाणीपुरवठा केला जात आहे.

या चार दुष्काळी तालुक्यांत पाऊस झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. पश्‍चिमेकडील वाई तालुक्यातही टंचाई जाणवत असल्याने या तालुक्यात एका टॅंकरद्वारे दोन गावांत पाणीपुरवठा केला जात आहे.

विहिरींचे अधिग्रहण

संरक्षित पाण्यासाठी प्रशासनाकडून विहीर व बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये माण व खटाव तालुक्यांत प्रत्येकी चार विहिरी व १५ बोअरवेल, फलटण तालुक्यात दोन विहिरी, कोरेगाव चार विहिरी व चार बोअरवेलचे व वाई तालुक्यात पाच विहिरींचे आधिग्रहण केले आहे. पाऊस नसल्याने पाण्यासाठी टँकरच्या मागणी वाढली असून, पावसाची अशीच परिस्थिती राहिली, तर टँकरचे शतक लवकरच पूर्ण होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT