Water Crisis : माजलगाव धरणाची पाणीपातळी साडेबारा टक्क्यांवर

Beed Water Shortage : पावसाळ्याचा तिसरा महिना लागला तरी देखील अद्यापही मोठा, पाणी साचेल असा, नदी-नाल्यांना पूर येईल असा एकही पाऊस झाला नाही.
Majalgaon dam
Majalgaon damAgrowon

Beed News : पावसाळ्याचा तिसरा महिना लागला तरी देखील अद्यापही मोठा, पाणी साचेल असा, नदी-नाल्यांना पूर येईल असा एकही पाऊस झाला नाही. परिणामी माजलगाव धरणाची पाणीपातळी खालावली असून धरण १२.६६ टक्क्यांवर आले आहे. तर पिके करपली असून जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार असून शेतकरी मात्र हतबल झाला आहे.

Majalgaon dam
Water Crisis : आरफळच्या पाण्यामुळे तासगावात दिलासा

माजलगाव धरणाच्या पाण्यावर मोठे सिंचनक्षेत्र अवलंबून आहे. मागील चार वर्षांपासून धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरत असून मागील वर्षीही धरण भरले होते. धरणातून माजलगाव शहर, बीड शहर व अकरा खेड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा होतो.

तर सर्वाधिक पाणी शेती सिंचनाला दिले जाते. तसेच परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रालाही धरणातून पाणीपुरवठा होतो. मागील वर्षी धरण भरल्याने शेती सिंचनाला हिवाळी हंगामात तीन व उन्हाळी हंगामात तीन असे सहा आवर्तने सोडण्यात आले होते.

Majalgaon dam
Water Crisis : धरणांना कोरडं ! सप्टेंबर उजाडूनही देशातील धरणं २२ टक्के रिकामी

बहुतांश शेतकऱ्यांनी या पाण्यावर उसाची लागवड केलेली आहे. परंतु सध्या लांबलेला पाऊस आणि यावर्षी धरणातून आवर्तन मिळणार नसल्याचे चित्र आहे. याचा फटका ऊस उत्पादकांना बसणार आहे.

यावर्षी पावसाळ्याचे तीन महिने संपले तरी देखील अद्याप जोरदार पाऊस बरसलेला नाही. मागील दीड महिन्यांपासून तालुक्यामध्ये पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून पिके करपून गेली आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com