Soil Health Agrowon
ताज्या बातम्या

Soil Health : ‘मृदा आरोग्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर आवश्यक’

जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर करणे आवश्यक असल्याचे, प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र खामगावचे विषय विशेषज्ञ कृषी विद्या डॉ. हनुमान गरुड यांनी केले.

टीम ॲग्रोवन

गेवराई, जि. बीड : जमिनीच्या आरोग्यासाठी (Soil Health) सेंद्रिय पदार्थांचा (Organic Matter) जमिनीत वापर करणे आवश्यक असल्याचे, प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र खामगावचे विषय विशेषज्ञ कृषी विद्या डॉ. हनुमान गरुड यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव व तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने रोहितळ ता. गेवराई येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गरुड बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गणेश मंडलिक, डॉ. भय्यासाहेब गायकवाड, गजेंद्र अढावे उपस्थित होते.

यावेळी डॉ. गरुड यांनी जागतिक मृदा दिनाचे महत्त्व, उद्दिष्ट सांगून यावर्षीच्या ‘‘माती: जिथे अन्नाची सुरवात या नुसार विषयानुसार उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. गरुड म्हणाले, की जगातील ९५ टक्के अन्नधान्य गरज ही मृदेच्या माध्यमातून भागवली जाते तसेच मृदेत पृथ्वीवरील एकूण सजीवांपैकी २५ टक्के सजीव आसरा घेतात. म्हणून मातीचे संवर्धन करणे अत्यावश्यक ठरते.

जमिनीत ५ टक्के सेंद्रिय पदार्थ आवश्यक असतात त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण राखले जाते. पिकांची उत्पादकता आणि जमिनीचा पोत राखण्यासाठी सेंद्रिय पदार्थ व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण महत्त्वाचे आहे. यासाठी जमिनीचे अन्न म्हणून प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष, शेणखत, कंपोस्ट खत, गांडुळ खत, हिरवळीचे खत इ सेंद्रिय खतांचा वापर करावा असा सल्ला दिला.

श्री आढावे यांनी माती तपासणीसाठी प्रातिनिधिक नमुना घेण्याची पद्धत सांगितली व नमुना घेण्याचे प्रात्येक्षिक करून दाखविले. प्रा. मंडलिक यांनी मोसंबी पीक व्यवस्थापन करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी प्रकाश टाकला. डॉ. गायकवाड यांनी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशी फरदड घेऊ नये असा मोलाचा सल्ला दिला. श्री वडकुते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी संतोष घसिंग तर आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक करण सुतार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT