World Soil Day 2022 : रासायनिक खतांच्या वापरावर मर्यादा आणावी

जागतिक मृदा दिन ५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभर साजरा केला जातो. संपूर्ण जीवसृष्टी जागविण्यात मृदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतकऱ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, जमिनीचे आरोग्य जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या वापरावर मर्यादा आणाव्यात.
Soil
SoilAgrowon

यवत, ता. दौंड ः ‘‘जागतिक मृदा दिन (World Soil Day) ५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभर साजरा केला जातो. संपूर्ण जीवसृष्टी जागविण्यात मृदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतकऱ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, जमिनीचे आरोग्य (Soil Health) जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizer) वापरावर मर्यादा आणाव्यात. पिकांची फेरपालट, हिरवळीच्या खतांचा (Green Manures) वापर करावा,’’ असे आवाहन ‘आत्मा’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी केले.

Soil
World Soil Day 2022 : उत्पादनवाढीसाठी मातीची गुणवत्ता राखणे आवश्यक

जागतिक मृदा दिनानिमित्त श्री रूपनवर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, ‘‘अधिक उत्पादकतेसाठी दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. यामुळे जमिनीचा पोतदेखील खालावत असून, शेताच्या परिसरातील वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होत आहे.

Soil
World Soil Day 2022: वनस्पतींंप्रमाणे माणसांनीही माती का खाल्ली पाहिजे?

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि त्याचे संवर्धन होण्याबरोबरच, धूप कमी करण्यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर, हिरवळीच्या खतांचा वापर वाढविण्याची गरज आहे. बांधावरील झाडांची संख्यादेखील वाढविणे गरजेचे आहे, यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील.

जमिनीची पूर्वमशागत करून धूप कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जमिनीत पाणी व्यवस्थापन व पुनर्भरण करणे गरजेचे आहे. जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी जमिनीत जर २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी व ५० टक्के खनिजे ( माती) व सेंद्रिय पदार्थ, असे उपलब्ध झाले तर ती जमीन उपजाऊ होत असते. शेतीचा व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते उपयुक्त असते. प्रत्येकाने आपल्या शेतावर असे प्रयत्न केले तरच मातीचा पोत चांगला राहील,’’ असेही श्री. महेश रूपनवर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com