Tomato Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Season : अतिपावसाने टोमॅटो हंगाम लवकर आटोपला

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अति पावसाचा टोमॅटो हंगामावर परिणाम झाला आहे. खरिपात लागवड केलेल्या टोमॅटोच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अति पावसाचा टोमॅटो हंगामावर (Tomato Season) परिणाम झाला आहे. खरिपात लागवड (Kharif Cultivation) केलेल्या टोमॅटोच्या उत्पादनावर (Tomato Production) विपरीत परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत साधारण २० दिवस आधीच हंगाम आटोपला आहे. संगमनेर बाजार समितीत टोमॅटोची सुमारे ८० टक्के आवक (Tomato Arrival) घटली आहे. २० दिवस आधीच उत्पादन बंद झाल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक भागांत टोमॅटोची झाडेच आली नाहीत, जेथे पीक आले, तेथे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

‘‘नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव यांसह सांगली, सातारा, सोलापूर व मराठवाड्यातील काही भागांत टोमॅटोचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. टोमॅटोची साधारण खरिपात जूनमध्ये लागवड केली जाते. खरिपासाठी जून महिन्यात लागवड केल्यानंतर पावणे तीन महिन्यांपासून बाजारात विक्री सुरु होती.

आक्टोबर नोव्हेबरपर्यंत हंगाम संपतो. संगमनेर, अकोल्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या दोन-तीन वर्षांपासून टोमॅटोवर ‘कुकुंबर मोझॅक’सह अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यातूनही सावरत शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. मात्र यंदा सतत पाऊस पडत असल्याने लागवडीपासूनच टोमॅटो उत्पादनाला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे टोमॅटोची झाडे जागेवरच सडली. त्यामुळे पीक वाया गेले,’’ असे टोमॅटो उत्पादक संदीप गुंजाळ म्हणाले.

कोट्यवधी रुपयांचा फटका

नगरच्या अकोले, संगमनेर, पारनेर, तर पुण्याच्या आंबेगाव, जुन्नर भागांत टोमॅटोला पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतात सतत पाणी साठवून राहिल्याने पाला सडला व फळांचेही नुकसान झाले. यंदा पाच टनांपर्यंतही उत्पादन निघाले नाही. दरवर्षीच्या तुलनेत बहुतांश भागातील शेतकऱ्यांना आधीच हंगाम आटोपता घ्यावा लागला. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

यंदा पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत सध्या आवकेत ८० टक्के घट झाली आहे. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
सतीश गुंजाळ, सचिव, बाजार समिती, संगमनेर.
टोमॅटो उत्पादन घेताना झाडांसाठी सतत पडणारा पाऊस नुकसान करणारा असतो. पानांचे नुकसान होते आणि त्याचा परिणाम फळ उत्पादनावर होतो. यंदा सततच्या पावसाचा टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत पावसामुळे झाडेच आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
विकास आरोटे, शेतकरी, मेहंदुरी, ता. अकोले, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Argentina Agriculture Market: अर्जेंटिनामध्ये फळे, प्रक्रिया उत्पादनांना मागणी

Summer Health Safety: उष्माघात दक्षतेबाबत यंत्रणा सुसज्ज ठेवा

Agri Water Management: तुषार सिंचनाधारित मॉडेलने वाढविली रब्बी पिकांची उत्पादकता

Farmers Protest: पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित, सरकारशी चर्चा सुरु, खरेदी व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन

Land Measurement: पुढच्या काळात केवळ १५ दिवसांत जमीन मोजणी, मग खरेदीखत अन् नंतर फेरफार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT