Tomato Rate : टोमॅटोची लाली टिकून

Anil Jadhao 

राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोची आवक कमी झाली आहे. मात्र टोमॅटोची मागणी टिकून आहे.

मागील आठवडाभरापासून काही भागांमध्ये पाऊस पडतोय. याचा फटका टोमॅटो पिकालाही बसतोय.

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील महत्वाच्या टोमॅटो उत्पादक पट्ट्याला पावसाचा फटका बसला. पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरीही अडचणीत आले आहेत. 

पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक बाजार समित्या वगळता टोमॅटो आवक नगण्य होतेय. त्यामुळं दरात तेजीत आहे.

राज्यातील छोट्या बाजार समित्या आणि बाजारांमधील टोमॅटो आवक खूपच कमी आहे. पावसामुळं टोमॅटो वाहतुकही अडचणीची ठरत आहे.

सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ७०० रुपये दर मिळतोय. टोमॅटोचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

cta image