Go Shala Agrowon
ताज्या बातम्या

Wardha Sevagram Ashram : महात्मा गांधींच्या गोशाळेला आर्थिक टंचाईच्या झळा

गोशाळा, गो-संवर्धन आणि गो-सेवा हे महात्मा गांधी यांच्या रचनात्मक कार्याचा एक भाग होता. याच कार्यातून महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात गो-शाळा सुरू केली.

Team Agrowon

वर्धा ः महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथील आश्रमात (Wardha Sevagram Ashram) गो-शाळा सुरू केली. ८७ वर्षांची होत असलेली ही गो-शाळा (Go Shala) सध्या आर्थिक टंचाईच्या झळा सोसत आहे. ही समस्या मार्गी काढण्यासाठी आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने पर्यटक आणि दात्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

गोशाळा, गो-संवर्धन आणि गो-सेवा हे महात्मा गांधी यांच्या रचनात्मक कार्याचा एक भाग होता. याच कार्यातून महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात गो-शाळा सुरू केली.

त्यांनी सुरू केलेले गो-संवर्धनाचे कार्य आश्रमात आजही सुरू आहे. सद्यःस्थितीत येथे ७५ गायी आहेत. या गायींपासून मिळणाऱ्या उत्पादनातून त्यांचेच भरणपोषण करणे कठीण होत आहे. आश्रम प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांत गोशाळा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या या गोशाळेतील एका गायीच्या संवर्धनासाठी वर्षाकाठी साधारणतः २१ हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे आश्रम प्रतिष्ठान सांगत आहे.

या गोशाळेतून रोज केवळ १६ लिटर दुधाचे उत्पादन होते. लोकसहभागातून उपलब्ध होत असलेल्या निधीतून एवढा खर्च शक्य नाही. महात्मा गांधींची गोशाळा बंद पडण्याची नामुष्की आश्रमावर येऊ नये याकरिता मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

शासनाचा मदतीस नकार

स्वावलंबी जीवनाची शिकवण देणारे सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम प्रतिष्ठान शासनाची कोणतीही मदत घेत नाही. येथील सर्व व्यवहार येथे तयार होत असलेल्या उत्पादनातून आणि पर्यटकांकडून येणाऱ्या मदतीतून होतो. यातून गो-शाळेचा पुरेपूर खर्च करणे अवघड होत आहे. यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

गो संवर्धनासह सेंद्रीय शेतीला प्रोत्साहित करणाऱ्या या गोशाळेतून मिळणाऱ्या उत्पादनातून खर्च करणे कठीण आहे. यामुळे गोशाळेचा विकासही होत नाही. या गोशाळेचा विकास करता यावा आणि येथे असलेल्या गोधनाची उत्तम सेवा करता यावी याकरिता दात्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
आशा बोथरा,अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम, जि. वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDKV Garlic Planter: दुष्काळात लसूण लागवडीत बियाण्याची बचत करा; पीडीकेव्हीचे टोकण यंत्र ठरेल फायदेशीर

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

SCROLL FOR NEXT