Yavatmal News : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक हतबलता लक्षात घेता त्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. .जिल्ह्यात गेले दोन महिने पावसाची संततधार होती. जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर येत जमीन खरडून गेल्याचेही प्रकार घडले. सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना या पावसाचा सर्वाधीक फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादकता खर्चाच्या भरपाईची चिंता आता भेडसावत आहे..Farmer Relief : पीकविमा न भरलेल्यानांही भरपाई देण्याचे प्रयत्न.संपूर्ण पीकच मातीमोल झाल्याने कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोय करण्याचे आवाहन शेतकऱ्यांसमोर आहे. खरीप हंगामातील कर्ज परतफेडीचे देखील आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. या सर्व बाबी विचारात घेत शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी म्हणून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. .Farmer Relief: बळीराजाच्या घरात प्रकाश पेरा.सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. आता सत्ता मिळताच या घोषणेचा त्यांना सोईस्करपणे विसर पडला आहे. याविरोधात आंदोलन झाल्यानंतर शासनाने काही निकषांवर कर्जमाफी देणार असल्याचे सांगितले. निवडणूक जिंकण्यापूरतेच आश्वासन शासनाकडून देण्यात आले असा त्याचा अर्थ होतो..ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याने सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेण्यात यावा, अशी देखील मागणी आहे. या संदर्भात वेळीच घोषणा न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे सभापती राजीव कसासावर, राजू येल्टीवार, राहूल दांडेकर, नीलेश येल्टीवार, गिरीधर उईके यांची उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.