Nashik News : सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसल्याने नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये ६ लाख २४ हजार ७८३ हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे. या तडाख्यात ८ लाख ७२ हजार ८०३ शेतकरी बाधित झाले आहेत. .नुकसानीच्यासंबंधी पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले आहेत. त्याच्यावर अंतिम नुकसान अहवाल १५ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाला सादर केला आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ६९३ कोटी १६ लाख रुपये निधी अपेक्षित आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादक संकटात .कृषी विभागाने शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार नाशिक विभागात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस होऊन झालेल्या नुकसानीमुळे विभागात ७ लाख ७७ हजार ४३३ शेतकरी बाधित झाले आहे. हे नुकसान ५ लाख ७० हजार ९३३.८७ हेक्टर इतके आहे. .या नुकसानभरपाईपोटी ६४६ कोटी ८७ लाख १४ हजारांचा निधी अपेक्षित आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख २७ हजार ५८० हेक्टरवर २ लाख ९९ हजार ८०६ हेक्टरवर हे नुकसान आहे. त्यापैकी ३२८ कोटींची अपेक्षित निधीची मागणी आहे. .Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित.जळगाव जिल्ह्यात २ लाख ५९ हजार ८७ हेक्टरवर ३ लाख ३२ हजार ५६५ शेतकऱ्यांचे नुकसान आहे. तुलनेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तुलनेने ही नुकसान कमी आहे. धुळ्यामध्ये ११ हजार ५९४ तर नंदुरबारमध्ये ४४५ हेक्टर क्षेत्रावर ते आहे. ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस होऊन झालेल्या नुकसानामुळे विभागात ९५ हजार ३७० शेतकरी बाधित झाले आहे. हे नुकसान ५३ हजार ८४९.६४ इतके आहे..या नुकसानभरपाईपोटी ४६ कोटी २८लाख ९५ हजारांचा निधी अपेक्षित आहेत.यामध्ये धुळे जिल्ह्यात ८८ हजार ८०५ शेतकरी बाधित आहेत.तर नाशिक जिल्ह्यातील ६ हजार ८६५ शेतकऱ्यांचे नुकसान आहे. तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात यामध्ये नुकसान नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.